सामाजिक जाणिवेतून केला वाढदिवस साजरा..



पद्माकर कापसे यांनी मुख्यमंत्री रिलीफ फंड कोविड 19 या फंडासाठी दिले  रुपये 25000/-( रुपये पंचवीस हजार )

कोल्हापूर ता, 21 (प्रतिनिधी ),'काही माणसे जन्मताच मोठी असतात तर काही माणसे  आपल्या कर्तुत्वाने मोठी झालेली असतात,, आई-वडिलांच्या सु संस्कारातून आपले अख्खे आयुष्य सामाजिक भान जपत कार्यरत असणाऱ्या हृदयस्पर्श सांस्कृतिक कल्चरल क्लबचे अध्यक्ष पद्माकर चिंतामणी कापसे यांनी आपला वाढदिवस साजरा न करता त्यावरील खर्च टाळून  कोरोना विषाणूच्या संसर्गजन्य रोगाला प्रतिबंधक उपाययोजनेसाठी मुख्यमंत्री सहायता निधी ला आज पंचवीस हजार रुपयेचा धनादेश राजाराम बापू  सहकारी बँके शाखा मंगळवार पेठेचे मॅनेजर प्रदिप मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली बँकेचे अधिकारी हर्षवर्धन पाटील यांच्याकडे सुपूर्द केला...!

 सामाजिक भान जपत त्यांनी मुख्यमंत्री सहायता निधीसाठी अर्थसहाय्य देऊन  इतरांच्या समोर एक आदर्श ठेवला,, 22 मार्च पासून संपूर्ण देश लॉक डाऊन झाला असताना लोकांना घरात राहणे सक्तीचे झाले,, अशावेळी लोकांचे एकटेपणा घालवण्यासाठी व या  रोगाच्या विरुद्ध पुकारलेल्या लढाईत प्रशासनाला सहकार्य करण्यासाठी आपल्या व्हाट्सअप ग्रुप च्या माध्यमातून त्यांनी सातत्याने लोकांना  आवाहन केले ,,तसेच या  काळात  लोकांच्यातील एकटेपण  घालवण्यासाठी सकारात्मक  ऊर्जा देण्याचे काम ही त्यांनी वेळोवेळी आपल्या लेखनातून केले आहे,, लोकांना केवळ घरात राहून जीवन नीरस वाटू नये यासाठी वेगवेगळ्या सांगितीक,, दिलासा देणाऱ्या,, तसेच मनोरंजन होणाऱ्या पोस्ट टाकून लोकांचे निखळ मनोरंजन केले ,,हृदयस्पर्श  कल्चरल ऍक्टिव्हिटीज ग्रुप मधून त्यांनी आतापर्यंत  साठ पेक्षा अधिक सांस्कृतिक कार्यक्रमाची  मेजवानी  रसिकांना मोफत दिली आहे, अत्यंत निरपेक्ष, निस्पृह पणे कोल्हापुरातील सांस्कृतिक चळवळ अखंडितपणे सुरू राहावी यासाठी पद्माकर कापसे यांनी काम केले आहे,, सांस्कृतिक कार्यक्रमाबरोबरच सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातही त्यांनी भरीव असे कार्य केले आहे,,, वृक्षारोपण, स्वच्छता मोहीम,गरीब व  गरजू विद्यार्थ्यांना मदत असेल,,, शिक्षकांना प्रेरणा आणि प्रोत्साहन देण्यासाठी पुरस्कार असेल आरोग्य शिबीर,रक्तदान, ,,,सामाजिक काम करणाऱ्या व्यक्तींना अहिंसा  पुरस्कार देऊन सन्मानित करून सामाजिक कार्यात त्यांचे मनोबल वाढविण्याचे काम करणे ,यासारख्या अनेक गोष्टी त्यांनी केल्या आहेत,,, अनेक सामाजिक संस्थामधुन वेगवेगळ्या पदावर ते कार्यरत असून प्रत्येक ठिकाणी ते अत्यंत तळमळीने निष्ठेने काम करतात,,  स्वतः आर्थिक पदरमोड करून लोकांना सांगीतिक सांस्कृतिक मेजवानी देण्यासाठी उत्साहाने सातत्याने काम करून कोल्हापूरची सांस्कृतिक चळवळ सुरू ठेवण्यासाठी धडपडणारे पद्माकर कापसे हे एक सांस्कृतिक माहिती देण्याचा  चालता बोलता  विश्वकोश च म्हणावा लागेल,,,,सामाजिक धार्मीक शैक्षणिक सहकार राजकिय विधायक अशा सार्वजनिक जीवनातील त्यांचे कार्य अव्याहतपणे सुरू आहे..घरी लोकडाऊन मध्ये बाहेर जाऊन समाज कार्य करू शकत  नसल्याने थोडं अस्वस्थता जाणवत असल्याने त्यानी निदान आपण शासन प्रशासन यांना अल्पसा का होईना सहकार्य करू शकतो आणि वाढदिवसाच्या  निमित्ताने त्यानी आज मुख्यमंत्री कोविड 19 रिलीफ फंडामध्ये 25 हजारांची रक्कम जमा करून समाजजीवनातील पवित्र कार्य करून इतरांनाही प्रेरणा दिलेली आहे..!
 प्रकाश सुतार.. मुख्याध्यापक संकल्प विद्यामंदिर साने गुरुजी वसाहत कोल्हापूर..

Comments