आमदार चंद्रकांत जाधव यांच्या विकास निधीतून
महापालिकेला वैद्यकीय यंत्रसामग्रीसाठी २० लाखांची मदत
कोल्हापूर, ता. 12 – कोरोनाविरुद्धची लढाई लढण्यासाठी आमदार चंद्रकांत जाधव यांनी मदतीचा हात दिला आहे. त्यांच्या स्थानिक विकास निधीतून महापालिकेला २० लाख रुपयांची मदत करण्यात आली.
कोरोनाची लढाई जिंकण्यासाठी प्रत्येक घटक आपल्या परीने प्रयत्न करीत आहे. याचाच एक भाग म्हणून महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये लागणारी यंत्रसामग्री खरेदी करण्यासाठी आमदार जाधव यांच्या स्थानिक विकास निधीतून २० लाख रुपयांची मदत महापालिकेला करण्यात आली. तशा आशयाचे पत्र त्यांनी आज जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्याकडे दिले.

Comments
Post a Comment