मटण, मासे व चिकन खरेदीसाठी गर्दी
कोल्हापूर,दि.१९ सिटी न्यूज नेटवर्क:
आषाढ महिना संपण्यास अवघे दोन दिवस उरले आहेत.त्यानंतर श्रावण सुरू होणार असल्याने रविवारी मटण मार्केटमध्ये चिकन, मटण,मासे, खेकडे यांसह मांसाहारी पदार्थ खरेदीसाठी नागरीकांनी मोठी गर्दी केली होती.
श्रावणात अनेक घरांमध्ये मांसाहारी पदार्थ केले जात नाहीत.त्यामुळे श्रावण महिना सुरू होण्यापूर्वी बहुसंख्य लोक मांसाहारी पदार्थांवर ताव मारतात. आषाढ महिना संपण्यास दोन दिवस उरल्याने रविवारी मटणासह इतर मांसाहारी पदार्थ खरेदीसाठी बाजारात गर्दी झाली होती.
Comments
Post a Comment