३० एप्रिल रोजी जन्मलेल्या व्यक्तींची वैशिष्ट्ये:-
तुमच्यावर मंगळ गुरू आणि हर्षल या तीन ग्रहांचा प्रभाव आहे. तुम्ही आयुष्यात सतत पुढे येण्याचा प्रयत्न करीत असतात. तुमच्यात जबरदस्त महत्त्वाकांक्षा असते. तुम्ही बुद्धिमान असतात आणि तुमच्या ज्ञानाविषयी तुम्हाला अहंकार असतो. तुम्ही धार्मिक असले तरी रूढी आणि परंपरा तुम्हाला आवडत नाहीत. तुम्ही बंडखोर विचारांचे आहात. इतरांच्या भल्यासाठी तुम्ही कष्ट घेतात. सुखासीन जीवनाकडे तुमचा ओढा असतो आणि भिन्नलिंगी व्यक्तींकडून तुम्हाला लाभ होतात. इतरांचे बारीकसारीक दोष तुम्ही सहज रित्या काढू शकतात. तुम्ही पोकळ अभिमान दाखवणे टाळले पाहिजे. इतरां करता तुम्ही स्वार्थत्याग करतात तरी तेच लोक तुमच्यावर कारस्थान करतात. तुम्हाला उपजतच ज्ञान असते आणि पुढे घडणाऱ्या घटनांची जाणीव होते. तुम्ही प्रेमळ असतात आणि लहान मुले तुम्हाला आवडतात. आयुष्यात उशिरा तुम्हाला मानमरातब आणि प्रसिद्धी मिळते. तुम्हाला प्रवासाची आवड असते आणि तुमच्या मध्ये दुर्दम्य उत्साह असतो. तुमच्या भोवती एक प्रकारचे वलय असते आणि आजूबाजूचे लोक तुमच्याकडे आकर्षित होतात. धार्मिक स्थळांना भेटी देणे तुम्हाला आवडते. शैक्षणिक क्षेत्रात तुम्ही उत्तम कामगिरी करतात. तुम्ही सतत कृतिशील असतात तरीही अस्वस्थ असतात. अडचणींना तुम्ही खंबीरपणे तोंड देऊ शकतात. धर्मादाय संस्था अपंगांच्या, संस्था यामध्ये तुम्ही आवडीने काम करतात आणि यासाठी तुम्ही कोणत्याही मोबदल्याची अपेक्षा करत नाही. वयाच्या 30 नंतर तुमचा भाग्योदय होतो आर्थिक बाबतीत तुम्ही भाग्यवान आहात. तुम्ही समाजप्रिय असून क्लब, सिनेमा, नाटके, सहली, प्रवास याची तुम्हाला आवड असते. तुम्ही कलासक्त असतात आणि घराची सजावट उत्तम करतात. कला, शास्त्र, संगीत यांचे तुम्हाला आवड असते. व्यायाम आणि खेळांची देखील तुम्हाला आवड असते.
व्यवसाय:- मंत्री, राजदुत, न्यायाधीश, वकील, सचिव, सावकार, जाहिरात वितरक, अभिनय, संगीतकार, धार्मिक, शिक्षक.
शुभ दिवस:- मंगळवार, गुरुवार, शुक्रवार.
शुभ रंग:- जांभळा.
शुभ रत्न:- पुष्कराज, मोती, लसण्या.
*व्यवसाय, भागीदार, मित्र, जोडीदार, या तारखेला जन्मलेली व्यक्ती पती किंवा पत्नी म्हणून कशी असेल तसेच तुमचा स्वभाव, भाग्योदय, आजार, तुमची शक्तीस्थाने, कमतरता, शुभ रत्ने इत्यादी माहिती अगदी अल्प किमतीत जाणून घ्या*
*कुंडली परीक्षण करण्यासाठी कृपया संपर्क करा. - ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. 8087520521*
Comments
Post a Comment