जयहिंदच्या नव्या रूपाचा कोल्हापूरमध्ये दिमाखदार शुभारंभ !
कोल्हापूर 27 सिटी न्यूज नेटवर्क
ब्रँडेड जेण्ट्स शॉपिंगसाठी कोल्हापुरात गेल्या 10 वर्षांपासून नावाजलेल्या जयहिंदच्या नवीन रूपाचा आज छत्रपती शाहू महाराज यांच्या शुभहस्ते कोल्हापूरमध्ये शुभारंभ करण्यात आला.या सोहळ्यास कोल्हापूरच्या नूतन आमदार जयश्री चंद्रकांत जाधव, जयहिंद ग्रुपचे चेअरमन श्री. नागराज जैन, संचालक श्री दिनेश जैन यांच्यासह कोल्हापुरातील प्रतिष्ठित मंडळी उपस्थित होती. या शुभारंभामुळे पूर्वी फक्त पुरूषांच्या वस्त्रखरेदीसाठी पंचक्रोशीत सुप्रसिध्द असणारं हे नाव आता यापुढे फॅमिली शॉपिंगसाठी देखील वाखाणलं जाणार आहे.
राजारामपुरी चौकात असणारे जयहिंद आता 15000 स्क्वे. फुटांच्या प्रशस्त जागेत तब्बल 5 मजल्यांसह सुसज्ज झाले आहे. या नव्या दालनाचं प्रमुख आकर्षण म्हणजे जयहिंदमध्ये आता जेण्ट्स वेअर सोबतच वूमन्स वेअर व चिल्ड्रन्स वेअरही उपलब्ध करून देण्यात आले आहे. त्यामुळे आज शुभारंभाच्या पहिल्याच दिवशी जयहिंदच्या या नव्या रूपाने कोल्हापूरकरांना आकर्षित केल्याचं चित्र पाहायला मिळालं.
पुरूषांसाठी फॉर्मल्स, कॅज्युअल्स, फॅब्रिक्स, बीस्पोक टेलरिंग व ॲक्सेसरीज्च्या नावीन्यपूर्ण व्हरायटी देणारे हे जयहिंद आता कोल्हापुरातल्या महिलांची ही आवड जपणारे आहे. ज्यामध्ये महाराष्ट्राच्या पारंपारिक साड्यांपासून ते भारतीय शैलीतील विविध वस्त्रप्रकार असणार आहेत. रोजच्या वापरापासून ते सणा - समारंभासाठीच्या पेहरावापर्यंत मोठी श्रेणी तुम्हांला इथे पाहायला मिळणार आहे. त्याचबरोबर वेस्टर्न प्रकारांमध्येही फॅशन व ट्रेंड तुमच्यासाठी इथे उपलब्ध करून देण्यात आले आहेत. तसेच मुलांसाठी कॅज्युअल्स, वेस्टर्न व एथनिक प्रकारातील मोठी रेंज इथे उपलब्ध करून देण्यात आली आहे. कोल्हापुरातील शाही समारंभासाठी जयहिंदचा ‘मेवार' हा एथनिक वेअर ब्रँडही नव्या दिमाखात सज्ज झालेला आहे. मेन्स व वूमेन्स एथनिक वेअरसाठी इथे 2 स्वतंत्र स्टुडिओज् देखील आहेत.
त्यामुळे आता कोल्हापुरातल्या संपूर्ण कुटुंबाची वस्त्रखरेदी ही आता जयहिंदमध्ये करता येणार आहे. शुभारंभानिमित्त दि. 27 ते 29 मे या काळात खास ऑफर देण्यात आलेली असून यामध्ये रू. 5000 व पुढील खरेदीवर 25% किंमतीचे फ्री शॉपिंग व्हाऊचर्सही देण्यात येणार आहे.
कोल्हापुरातल्या संपूर्ण कुटुंबांचे शॉपिंग जयहिंदमध्ये व्हावे याच विचारातून हे जयहिंदचे नवे रूप आम्ही कोल्हापुरकरांसमोर आणले आहे असे जयहिंदचे संचालक श्री. दिनेश जैन यांनी याप्रसंगी सांगितले. कोल्हापुरातलं नवं ‘फॅमिली शॉपिंग डेस्टिनेशन' होऊ पाहणाऱ्या या जयहिंदच्या शुभारंभास कोल्हापूरकर मोठ्या संख्येत आवर्जून उपस्थित होते आणि त्यांनी फॅमिली शॉपिंगचा आनंद लुटला. असाच आनंद कोल्हापूर व पंचक्रोशीतील कुटुंबांनी घेण्यासाठी यावे आणि शुभारंभ ऑफर्सचाही लाभ घ्यावा असे आवाहनही श्री. दिनेश जैन यांनी केले.
Comments
Post a Comment