स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवापासून स्वर्णिम भारताकडे’ वाटचालीसाठी मिडीयाचे सकारात्मक योगदान मोलाचे - मधुबन न्युज संपादक कोमल भाई
‘स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवापासून स्वर्णिम भारताकडे’ वाटचालीसाठी मिडीयाचे सकारात्मक योगदान मोलाचे - मधुबन न्युज संपादक कोमल भाई
कोल्हापूर - 29 सिटी न्यूज नेटवर्क
कोल्हापूर प्रेस क्लब यांच्या यांच्या वतीने भारत सरकार संस्कृति मंत्रालय वतीने समाजाचे हित जपणारा आणि अन्यायाविरुद्ध तितक्याच ताकदीने आवाज उठवत असलेल्या समस्त मिडियाने भविष्यात आपले सकारात्मक योगदान जीवनच सुवर्ण भारताच्या विश्वगुरू बनण्यासाठी पुर्णपणे देवून या प्रक्रियेत गतिमानता द्यावी असे आग्रही प्रतिपादन मधुबन न्यूज चे संपादन कोमल भाई यांनी केले शिवाजी पेठेतील मुख्यालयात संपन्न झालेल्या कार्यशाळेत ते बोलत होते . समाजामध्ये शांतपणे रचनात्मक कार्य करत सकारात्मकता वाढवत असलेल्या अनेक प्रकल्पाची आणि त्यांच्या त्यांच्या कार्याची दखल फार कमी वेळां घेतली जाते.हे चित्र बदलण्यासाठी अशा कार्यशाळा सातत्याने घेतले जातील आणि संवाद वाढवला जाईल असेही कोमल व यांनी नमूद केले . कोल्हापूर ब्रम्हकुमारीज संचालिका कोल्हापूर आदरणीय राजयोगीनी सुनंदा दिदिजी यांचे या कार्यक्रमासाठी आशिर्वचन लाभले त्यांनी समाजातील अत्यंत तणावपूर्ण परिस्थितीत सकारात्मक व्यक्तिगत पातळीवर आणि आणि सामाजिक परिवर्तन व्यक्त होणे हे प्रत्येकासाठी गरजेचे आहे त्यासाठी सर्वांनी राजीव करावा असे आव्हान करत त्यांनी त्याचे प्रत्यक्ष की सर्वांच्या कडून करून घेत एक अध्यात्मिक माहोल निर्माण केला . ब्रम्हाकुमारी चे आगामी उपक्रमाची माहिती रघूभाई यांनी देत माऊंट अबू येथे होणाऱ्या आगामी राष्ट्रीय कार्यशाळेत सहभागी होण्याचे आहवान केले . या कार्यक्रमांत सहसंयोजक मोहन मेस्त्री अध्यक्ष कोल्हापूर प्रेस क्लब, उपाध्यक्ष उद्धव गोडवे, संचालक राजेंद मकोटे यांनीही आपली मनोगते व्यक्त करत आगामी काळात पॉझिटीव्ह जर्न्यालिसम साठी आग्रही राहण्याची ग्वाही दिली . जाहिरात क्षेत्रातील अभ्यासू आसमा अभ्यासक सुनील बासरानी, सह एम्पा एव्हेन्ट संघटनेचे शामभाई बासरानी , वितरक संघटना प्रतिनिधी किरण व्हनगुत्ते यांनीही आपली मनोगते व्यक्त केली . तर आरोग्य विभाग उपसंचालिका भावना चौधरी यांनी मनोगत व्यक्त करताना 'प्रशासन आणि स्वयंसेवी संस्था आणि माध्यम यांच्या एकत्रीकरणातून समाजातील सकारात्मकता वाढवण्यासाठी नक्कीच चांगले प्रयत्न होतील आणि त्याची ही कार्यशाळा सुरुवात असल्याचे सांगत आपल्या शुभेच्छा व्यक्त केल्या . या कार्यशाळेत विविध वृत्तपत्रे वृत्तवाहिन्यांचे प्रतिनिधी तसेच मुक्त पत्रकार, वाचकाचे पत्र लिहिणारे लेखक यांच्या टिटवे येथील शहीद वीर पत्नी लक्ष्मी महाविद्यालयातील वृत्तपत्रविद्या विभागाच्या विद्यार्थिनी यांचाही सहभाग होता . स्नेह भोजनाने या कार्यशाळेची सांगता झाली . क्रांती सिंह च्या संपादक सुनंदा मोरे , मालोजी केरकर , संघर्ष नायक चे आठवले , गुलाब बाबा अकोळकर , मेघा कुलकर्णी , श्रद्धा जोगळेकर , शुभांगी तावरे , सागर ठाणेकर, बाबा खाडे सह मान्यवराची यावेळी उपस्थिती होती .
Comments
Post a Comment