..त्या वाहनचालकाची मंत्री आव्हाडांनी दिलगिरी व्यक्त करावी: 'आप'च्या संदीप देसाई यांची मागणी

 


..त्या वाहनचालकाची मंत्री आव्हाडांनी दिलगिरी व्यक्त करावी: 'आप'च्या संदीप देसाई यांची मागणी



कोल्हापूर 30 सिटी न्यूज नेटवर्क

राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड आज कोल्हापूर दौऱ्यावर होते. या दौऱ्यावर असताना सकाळी त्यांचा ताफा अंबाबाई मंदिर येथे आल्यावर चारचाकी गाडी बाजूला घेण्यासाठी एका पोलीस कर्मचाऱ्याने त्या वाहचालकाला कानशिलात मारली. या घटनेवर तीव्र प्रतिक्रिया शहरभर उमटत आहेत. यावर भूमिका घेत मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी स्वतः या घटनेबद्दल दिलगिरी व्यक्त करावी अशी मागणी आम आदमी पार्टीचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष संदीप देसाई यांनी केली आहे. 


जेवढा एखाद्या मंत्र्यांचा वेळ महत्वाचा आहे तेवढाच सामान्य नागरिकांचा देखील आहे. मंत्र्यांच्या दौऱ्यासाठी जर रस्ता मोकळा करत असताना सामान्य नागरिकाला मारहाण होत असेल तर त्याचा निषेध आम आदमी पार्टी करत असल्याचे पक्षाच्या वतीने पत्रक प्रसिद्ध केले आहे.

Comments