राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी भाजप कडून धनंजय महाडिक यांचा उमेदवारी अर्ज दाखल

 राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी भाजप कडून धनंजय महाडिक यांचा उमेदवारी अर्ज दाखल, विजयाची खात्री असल्याचा दावा




मुंबई 30 सिटी न्यूज नेटवर्क

बहुचर्चित राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी आज भाजप कडून कोल्हापूरचे माजी खासदार धनंजय महाडिक यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत दादा पाटील, प्रविण दरेकर, आमदार आशिष शेलार, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील उपस्थित होते.  

आज भाजप कडून राज्यसभेसाठी तीन उमेदवारांचे अर्ज भरण्यात आले. पियुष गोयल, अनिल बोंडे आणि धनंजय महाडिक यांनी अर्ज दाखल केल्यानंतर, विजयाची खात्री व्यक्त केली. विशेष करून राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी मोठी चुरस आहे. मात्र विरोधी पक्षातील नाराजी, महाडिक यांच्या विजयाला हातभार लावेल, असा विश्वास देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

Comments