दैनिक राशिभविष्य

 रवीवार, १९ जून २०२२




. जेष्ठ कृष्ण षष्ठी. ग्रीष्म ऋतू. शुभकृत नाम संवत्सर. राशिभविष्य - ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. (संपर्क - 8087520521)


राहुकाळ - दुपारी ४.३० ते संध्याकाळी ६.००


"आज चांगला दिवस, आज सकाळी १०.५२ पर्यंत 'विषकन्भ' योग आहे नंतर 'प्रीती' योग आहे. " 


चंद्रनक्षत्र - शततारका 


टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या "राशीभाव" या  फेसबुक पेजला भेट द्या.



मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) उत्तम दिवस आहे. चैनीवर कझारच कराल. लाभ होतील. 

     

वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) संमिश्र दिवस आहे. कामाचा तणाव वाढेल. प्रवासात अडथळे येतील. महत्वाची कामे आज नकोत. 

 

मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) आज तीर्थयात्रा घालेल. ग्रंथलेखन होईल. बौद्धिक क्षेत्रात चमक दाखवाल.


कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) आरोग्याचे प्रश्न निर्माण होतात. प्रवासातून त्रास. वाहन जपून चालवा.

 

सिंह:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) भागीदारी व्यवसायात लक्ष घालावे लागेल. जोडीदाराशी जुळवून घ्या. संवाद कौशल्य वापरा.

  

कन्या:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) आर्थिक प्रगती होईल. रसायने हाताळताना काळजी घ्या. व्यसने टाळा. 

 

तुळ:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) गैरसमज होऊ शकतात. बोलताना काळजी घ्या. धाडस नको.


वृश्चिक:- (ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) मनस्वास्थ्य बिघडू देऊ नका. कुटुंबास वेळ द्या. राहत्या जागेचे प्रश्न निर्माण होतील.

 

धनू:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) आर्थिक प्रगती होईल. संवादातून मार्ग निघतील. अडथळे दूर होतील.


मकर:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) कलाकारांना यश मिळेल. आत्मविश्वास वाढेल. मन प्रसन्न होईल. आर्थिक प्रश्न सुटतील.

 

कुंभ:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) आत्मविश्वास वाढेल. हानी भरून निघेल. वक्तृव चमकेल. 


मीन:-  मौल्यवान खरेदी होईल. मन आनंदी राहील. दूरचे प्रवास टाळा.


(कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, 'राशीभाव' या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. "राशीभाव" या फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी -  8087520521)

Comments