शिवसेनेच्या फलकांना हात लावाल तर याद राखा : शिवसैनिकांचा इशारा

 शिवसेनेच्या फलकांना हात लावाल तर याद राखा : शिवसैनिकांचा इशारा




 कोल्हापूर 25 सिटी न्यूज नेटवर्क

 शिवसेनेत वरिष्ठ पातळीवर आजच्या घडामोडी सुरू असताना याचा गैरफायदा घेऊन  वैयक्तिक आकसापोटी कोल्हापूर शहरातील शिवसेना शिवाजी पेठ विभागीय कार्यालयावरील  आणि  लांड चौक येथील शिवसेना शाखेच्या फलकाची विटंबना एका टोळक्यात कडून केली गेली. या टोळक्यांस शिवसेना पदाधिकारी आणि शिवसैनिकांनी इशारा देत कार्यालयाचा  फलक पुन्हा नव्याने झळकावला. यावेळी शिवसेना शहर प्रमुख जयवंत हारूगले, उपशहर प्रमुख  रणजित जाधव, तुकाराम साळोखे, कपिल सरनाईक, सनी अतिग्रे, राजू काझी, युवासेनेचे योगेश चौगले, पियुष चव्हाण, विश्वदीप  साळोखे, शैलेश गवळी, शुभम शिंदे, मिलिंद साळोखे, मयूर संकपाळ, राकेश साळोखे, उदय घोरपडे, सचिन भोळे, राज कापसे, बबन गवळी, संतोष रेवणकर, पप्पु रजपूत, आसिफ मुल्ला, धनंजय माने आदी शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.

Comments