यशवंत सिन्हा विरोधी पक्षाचे राष्ट्रपतिपदाचे उमेदवार

                                       यशवंत सिन्हा विरोधी पक्षाचे राष्ट्रपतिपदाचे उमेदवार



                                                    

नवी दिल्ली २१ सिटी न्यूज नेटवर्क 

माजी केंद्रीय मंत्री यशवंत सिन्हा हे राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत विरोधी पक्षांचे  उमेदवार असतील. मंगळवारी दिल्लीत झालेल्या विरोधी पक्षांच्या बैठकीत यशवंत सिन्हा  यांच्या नावाची एकमताने निवड करण्यात आली. बैठकीनंतर काँग्रेस नेते जयराम रमेश म्हणाले “आम्ही (विरोधी पक्षांनी) एकमताने निर्णय घेतला आहे की यशवंत सिन्हा हे राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी विरोधी उमेदवार असतील.तर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले की, आम्ही राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीसाठी 27 जून रोजी सकाळी 11:30 वाजता अर्ज दाखल करणार आहोत. तत्पूर्वी आज यशवंत सिन्हा यांनी तृणमूल काँग्रेसमधून राजीनामा देण्याची घोषणा केली आणि ते म्हणाले की ते आता मोठ्या विरोधी एकजुटीच्या व्यापक राष्ट्रीय उद्दिष्टासाठी काम करतील

Comments