महानगरपालिकेच्या डांबराची कोल्हापुरात चर्चा
'आप' रिक्षा संघटनेच्या रिक्षाचालकाने लावला फलक
कोल्हापूर 15 सिटी न्यूज नेटवर्क
पावसाळा आला की महानगरपालिकेने केलेल्या रस्त्यांवर खड्डे पडतात. याच खड्ड्यांचा निषेध म्हणून आम आदमी रिक्षाचालक संघटने सभासद असणाऱ्या रिक्षाचालक हणमंत जाधव यांनी आपल्या रिक्षावर मार्मिक संदेश लिहत पाण्यात लवकर विरघळणारा पदार्थ मीठ की साखर असा प्रश्न विचारला आहे. त्याचं उत्तर लिहलंय महानगरपालिकेचा डांबर. अशापद्धतीने महानगरपालिकेच्या दर्जाहीन काम चव्हाट्यावर आणून रिक्षाचालक जाधव काकांनी महापालिकेच्या भोंगळ कारभार सगळ्यांसमोर आणला आहे.
संघटनेचे मार्गदर्शक संदीप देसाई यांनी जाधव यांची भेट घेऊन महापालिकेचा कारभार उघड करण्याचं धाडस केल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले.
Comments
Post a Comment