समाजातील नेमक्या गरजू व्यक्ती आणि रोटरी मध्ये विश्वासू समन्वयक म्हणून पत्रकार विश्वाने कार्यरत रहावे - रो . प्रविण कुंभोजकर
समाजातील नेमक्या गरजू व्यक्ती आणि रोटरी मध्ये विश्वासू समन्वयक म्हणून पत्रकार विश्वाने कार्यरत रहावे - रो . प्रविण कुंभोजकर
कोल्हापूर २८ सिटी न्यूज नेटवर्क
कोल्हापूर प्रेस क्लब’ आणि ‘श्रम फाऊंडेशन’ यांच्या वतीने आरोग्य - श्रम कार्ड शिबिर - उद्यमनगर मधील वालावलकर हॉस्पीटल येथे आयोजन - रोटरी क्लब - जाधव ग्रंथालयाचे सहकार्य संपन्न होऊन त्यांचा लाभ १९० हून अधिक मिडिया विश्वातील बंधू - भगिनी नी घेतला . या शिबिरात श्रम कार्ड काढण्यासाठी टाकाळा येथील जाधव वाचनालयाचे शहाजी पाटील , डोळे-दात यांची तपासणी साठी वालावलकर हॉस्पीटल चे संतोष कुलकर्णी - विरेंद्र वणकुद्रे ' रक्तदान शिबिरासाठी वैभव लक्ष्मी ब्लड बँक आदि चे मोलाचे सहकार्य लाभले .
रोटरी इंटरनॅशनल क्लब चे सेवा विभाग समन्वयक प्रविण कुंभोजकर यांनी या वेळी शुभेच्छा देताना ' समाजातील विविध क्षेत्रात प्रत्यक्ष सहभागी असलेल्या पत्रकारांना नेमक्या गरजू व्यक्ती ची नेमकी जाण व माहिती असते - ती त्यांनी वेळोवेळी रोटरी सह विविद्य सेवाभावी संस्थापर्यत पोहचवून मोलाची भूमिका पार पाडावी ' असे आग्रहाने नमूद केले . तसेच गेली १३ वर्षाहून अधिक काळ रोटरी च्या 300 हून अधिक नेत्र तपासणी शिबीरामध्ये सहभागी योगदानाबद्दल विरेंद्र वणकुद्रे चा रोटरी सेवा विभाग वतीने विशेष स्मृती चिन्ह देवून सत्कार करण्यात आला . यासह रोटरी विश्वातील महत्वाचे आगामी वर्षाचे गव्हर्नर पद भूषविणारे डॉ. नासिर बोरदसवाला यांनी ही आपली उपस्थिती लावून आगामी भरीव प्रकल्पासाठी भविष्यात सहकार्य करण्याचे घोषित करून सर्वाचा उत्साह वाढवला . यावेळी क्रिडा संघटक - माजी नगरसेवक काका पाटील , सावली केअर - द ब्रीज चे किशोर देशपांडे , जयभारत हायस्कूल च्या आश्विनी पाटील , शाहू मिल कॉलनी संघटनेचे राजु गायकवाड , पांजरपोळ औद्योगिक वसाहतीचे फिरोज मुजावर ' पाचगांव चे माजी सरपंच चंद्रकांत कोंदेकरी , मॅगो एम . एम .90.4 चे अशिष कदम सह विविध क्षेत्रातील मान्यवरानी भेटी देवून शुभेच्छा दिल्या . या संयुक्त उपक्रमाच्या यशस्वितेसाठी कोल्हापूर प्रेस क्लब चे अध्यक्ष मोहन मेस्त्री, संचालक राजेंद्र मकाटे, शितल धन वडे , श्रद्धा जोगळेकर , शुंभागी तावरे यांनी तसेच श्रम प्रतिष्ठानचे कमलाकर सांरग सह पदाधिकारी यांनी विशेष परिश्रम घेतले.
Comments
Post a Comment