जिओफायबर ला उदंड प्रतिसाद
प्रत्येक 10 पैकी 8 नवीन वायरलाइन ब्रॉडबँड ग्राहकांची जिओफायबर ला पसंती- ट्राय
कोल्हापूर २५ सिटी न्यूज नेटवर्क
जिओ फायबरने वायरलाइन ब्रॉडबँड सेगमेंटमध्ये खळबळ उडवून दिली आहे. कंपनीच्या म्हणण्यानुसार, सुमारे 80 टक्के नवीन वायरलाइन ग्राहक जिओफायबर शी कनेक्ट होत आहेत. वायरलाइन ब्रॉडबँड सेगमेंटमध्ये जिओ फायबर पहिल्या क्रमांकावर कायम आहे. ट्रायचे आकडेही याची पुष्टी करतात.
वायरलेस ब्रॉडबँड सेवेमध्ये जिओ ५३% मार्केट शेअरसह अव्वल स्थानावर आहे. डेटा वापराच्या बाबतीतही जिओ कोसो पुढे आहे. जिओचा 60 टक्के 'डेटा ट्रॅफिक मार्केट शेअर' आहे, जो एअरटेल आणि व्ही च्या एकत्रित वापरापेक्षा जास्त आहे. जिओ नेटवर्कवरील ग्राहक दरमहा सरासरी 20.8 जीबी डेटा वापरत आहेत. त्याच वेळी, प्रति ग्राहक प्रति महिना व्हॉइस कॉलिंग देखील 1000 मिनिटांपेक्षा जास्त आहे.
तिमाही निकाल दाखवतात की रिलायन्स जिओचा प्रति महिना प्रति वापरकर्ता महसूल देखील 175.7 रुपयांच्या पातळीवर पोहोचला आहे. आर्थिक वर्ष 2022-23 च्या पहिल्या तिमाहीत रिलायन्स जिओ इन्फोकॉमचा स्टँडअलोन निव्वळ नफा वर्षानुवर्षे सुमारे 24 टक्क्यांनी वाढून 4,335 कोटी रुपयांवर पोहोचला आहे.
Comments
Post a Comment