महाराष्ट्र राज्य युवा पत्रकार संघाची एक दिवशीय कार्यशाळा संपन्न
कोल्हापूर 24 सिटी न्यूज नेटवर्क
युवा पत्रकार संघ महाराष्ट्र राज्याच्या वतीने एकदिवसीय विभागीय कार्यशाळा पन्हाळगड येथे घेण्यात आली. कार्यशाळेत पन्हाळा परिसरातील ग्रामीण पत्रकार छायाचित्रकार उपस्थित होते. कार्यशाळेत मार्गदर्शन करनाऱ्या मान्यवारंच्या वतीने पत्रकार संरक्षण कायदा, प्रिंट मिडिया व डिजिटल मिडिया मध्ये पत्रकारीतेचा बदल होत चाललेल्या गोष्टींबद्दल मार्गदर्शन करण्यात आले.
यावेळी ऍड. संदीप पवार म्हणाले पत्रकार संरक्षण संदर्भात संरक्षण कायदा व्हावा अशी जेष्ठ पत्रकारांनी मागणी केली होती.तो कायदा आता पास झाला आहे. पत्रकारांनी बातमी व वार्तांकन करत असताना निर्भिड व निपक्ष पने केले पाहिजे. पत्रकारांना कोणतीही अडचण आल्यास, पत्रकार संरक्षण कायदा व इतर बाबी मी एक पत्रकार संघटनेचा घटक म्हणून पत्रकारांना मदत करण्याचे आश्वासन दिले.
तसेच यावेळी गोमटेश विद्यपीठ चे व्हा. चेअरमन प्रशांत पाटील बोलताना म्हणाले की पत्रकारांनी सत्य वस्तुस्थिती वर बातमी करून सर्वसामान्यांना न्याय दिला पाहिजे. वाचक वर्गामध्ये अत्याधूनिक तंत्रज्ञानामुळे जलद गतीने पत्रकारितेत बदल होत चालल्याने विश्वासहर्ता कमी होत चालली आहे.
पत्रकारांनी केवळ काम आणि व्यवसाय म्हणून पत्रकारितेकडे न पाहता वाचक वर्गामध्ये विश्वासहर्ता कसे टिकून राहील व न्यायिक दृष्टिकोनातून काम केले पाहिजे. युवा पत्रकार संघटनेच्या वतीने ग्रामीण दुर्गम भागामध्ये पत्रकारांसाठी कार्यशाळा घ्यायला पाहिजे व त्यांच्या समस्या सोडवल्या पाहिजे असे त्यांनी म्हणाले.
विशेषतः आजच्या पत्रकार कार्यशाळा साठी प्रमुख वक्ते म्हणून दिल्ली (IIMC) मधून पत्रकारितेचे विशेष शिक्षण घेऊन आलेले, शिवाजी विद्यपीठ आणि संजय घोडावत युनिव्हर्सिटी मधे मास कम्युनिकेशन विभागात गेस्ट लेक्चरर म्हणून काम करत असलेले विवेक पोर्लेकर सर त्यांनी उपस्थित पत्रकारांना मार्गदर्शन करताना पत्रकारितेचा सुरुवाती पासूनच्या प्रवासाबद्दल सांगताना ते म्हणाले की
छपाई यंत्राचा शोध लागल्यानंतर एकाच वेळी अनेक लोकांपर्यंत माहिती पोहचवण्यास मदत होऊ लागली. त्यानंतर नभोवाणी, दूरचित्रवाणी, संगणक, इंटरनेट या सर्वांच्या शोधामुळे पत्रकारिता करणे अजून सोपे झाले.
पुढे ते म्हणाले की, सध्याच्या माहिती तंत्रज्ञानाच्या युगात माहितीचे वितरण करत असताना सरकारी कायदे, न्यायमंडळ, कार्यकारी मंडळ तसेच नैतिक आचारसंहिता याच्या चौकटीत राहून पत्रकारिता करायला हवी.शेवटी त्यांनी पत्रकारिते संदर्भात बोलताना येणाऱ्या भविष्य काळात पत्रकारिता करणे सोपे असले तरी मर्यादा व भान राखून पत्रकारांनी काळजी घतेली पाहिजे.तसेच पत्रकारितेचे अधिकृत शिक्षण व अनुभव घेऊनच या क्षेत्रात उतरण्याचा सल्ला त्यांनी दिला.
त्याच बरोबर मानस वेधवृत चे संपादक नंदकुमार तेली यांनी नवीन नवोदित पत्रकारांनी ज्येष्ठ पत्रकारांचे सल्ला घेतले पाहिजे माझ्या प्रदीर्घ पणे पत्रकारितेत काम केलेल्या अनुभवातून मी तुम्हाला सांगतो आलेल्या अडचणी समस्या सामोरे जाऊन मी पत्रकारिता केली आहे पत्रकारांनी कोणत्याही आमिषाला भिड न घालता पत्रकारिता केली पाहिजे निर्भीडपणे लिखान करा आम्ही तुमच्या पाठीशी आहोत संघटना तुमच्या पाठीशी आहे असे ही ते म्हणाले.
या पत्रकार कार्यशाळा कार्यक्रमाला पन्हाळा नगरपरिषदच्या नगराध्यक्षा सौ रुपाली रविंद्र दडेल व समाज सेवक रविंद्र दडेल विशेष करून उपस्थित होते.सौ. रुपाली दडेल यांनी आपल्या मनोगतात म्हणाल्या युवा पत्रकार संघाने आयोजित केलेल्या पन्हाळा गडावर पत्रकार कार्यशाळेबद्दल समाधान व्यक्त करून कौतुक केले. कार्यशाळेचा लाभ सर्व पत्रकारांना, सर्व वक्त्यांच्या वतीने केलेले मार्गदर्शन उपयुक्त ठरेल याचा मला विश्वास आहे.या कार्यशाळेला प्रमुख पाहुणे म्हणून बोलावल्या बद्दल संघाला पुढील वाटचालीस शुभेच्छा देउन आभार मानले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थापक अध्यक्ष शिवाजी शिंगे यांनी केले तर आभार पत्रकार प्रकाश कांबळे यांनी मनाले.या कार्यक्रमाला जावेद देवडी, तुकाराम कदम, मार्था भोसले, प्रकाश कांबळे, कौतुक नागवेकर, अभिजीत निर्मळे, सतीश चव्हाण, अजय शिंगे, शैलेश माने,सागर चौगुले, धीरज आयरे, सागर पाटील, उदय बेलवकर, सौ. पूजा चव्हाण, रतन हुलस्वार, रत्नदीप चव्हाण, नितीन ढाले, राकेश पोलादे, कमलाकर सारंग, गौरव यादव,संतोष कुरणे, दत्तात्रय सुतार, शरद गाडे पदाधिकारी व पत्रकार उपस्थित होते..
Comments
Post a Comment