गणेशोत्सव, दहीहंडी निर्बंधमुक्त केल्याबद्दल शिवसेनेच्यावतीने साखर-पेठे वाटून आनंदोत्सव साजरा


गणेशोत्सव, दहीहंडी निर्बंधमुक्त केल्याबद्दल शिवसेनेच्यावतीने साखर-पेठे वाटून आनंदोत्सव साजरा 




कोल्हापूर दि.२१ सिटी न्यूज नेटवर्क

हिंदुत्वाच्या विचारांशी मुख्यमंत्री नाम.मा.श्री.एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री नाम.मा.श्री.देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली एकत्र आलेले शिवसेना -भाजप युतीचे राज्य सरकार हिंदुत्वाबाबत सकारात्मक निर्णय घेत आहे. सत्ता स्थापनेनंतर छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिव हा नामांतरचा पहिला निर्णय घेण्यात आला. यानंतर आता हिंदू धर्मियांच्या धार्मिकतेचा आणि जिव्हाळ्याचे असणारे गणेशोत्सव आणि दहीहंडी हे सण निर्बंधमुक्त केल्याबद्दल राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री.राजेश क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाने कोल्हापूर शहरात छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे शिवसेनेच्या वतीने जोरदार आनंदोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी शिवसेना पदाधिकारी, महिला आघाडी आणि शिवसैनिकांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरातील नागरिकांना वाद्याच्या गजरात साखर पेठे वाटप करण्यात आले.  यावेळी शिवसैनिकांनी "शिवसेना जिंदाबाद", "शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा विजय असो", "मुख्यमंत्री नाम.एकनाथ शिंदे यांचा विजय असो" अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला.  

यावेळी शिवसेनेचे शहरप्रमुख जयवंत हारुगले, शहरप्रमुख शिवाजी जाधव, जेष्ठ हिंदुत्ववादी उदय बाबा भोसले, महिला आघाडीच्या सौ.मंगलताई साळोखे, सौ.मंगलताई कुलकर्णी, सौ.गौरी माळतकर, किशोर घाटगे, रणजीत जाधव, तुकाराम साळोखे, अमित चव्हाण, सुनील खोत, दीपक चव्हाण, योगेश चौगले, विश्वदीप साळोखे, सनी अतिग्रे, धनाजी कारंडे, मंदार तपकिरे, निलेश हंकारे, मुकुंद सावंत, ओंकार परमणे, टिंकू देशपांडे, कपिल सरनाईक, शिवतेज सावंत, कपिल केसरकर, सौरभ कुलकर्णी, अंकुश निपाणीकर, सुनील माने, रियाज बागवान, सागर कलघटकी, शैलेंद्र गवळी, कपिल नाळे, अर्जुन आंबी, कल्पेश नाळे, विनोद हजारे,  यांच्यासह शिवसेना, युवासेना, महिला आघाडी पदाधिकारी आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Comments