खंडपीठ प्रश्न जिव्हाळ्याचा, तातडीने मार्गी लावू : मुख्यमंत्री ना.मा.श्री.एकनाथ शिंदे


खंडपीठ प्रश्न जिव्हाळ्याचा, तातडीने मार्गी लावू : मुख्यमंत्री ना.मा.श्री.एकनाथ शिंदे




खंडपीठ कृती समितीने घेतली मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांची भेट 



कोल्हापूर दि.२५ सिटी न्यूज नेटवर्क

कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, रत्नागिरी व सिंधुदुर्ग या सहा जिल्ह्याकरिता कोल्हापूर येथे उच्च न्यायालयाचे खंडपीठ स्थापन व्हावे अशी मागणी गेली ३० वर्षापासून होत आहे. मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ स्थापन व्हावे, याकरिता सहाही जिल्ह्यातील जनतेने, वकील, पक्षकार, आदींनी मागणी केली आहे. या मागणीकरिता मागील ३० वर्षापासून आंदोलन सुरु आहे. गेल्या दोन दिवसांपूर्वी मा.मुख्य न्यायमूर्ती यांच्या कार्यालयाकडून खंडपीठ कृती समितीस पत्र व्यवहार करण्यात आला असून, सदर बाबततीत मा.मुख्य न्यायमूर्ती देखील सकारात्मक असून, मा.मुख्यमंत्री महोद्यांशी चर्चा करून याबाबतीत निर्णय घेणार असल्याचा उल्लेख केला आहे. या प्रश्नी खंडपीठ कृती समितीच्या शिष्ठमंडळाची मुख्यमंत्री नाम.श्री.एकनाथ शिंदे यांच्यासोबत भेट घडवून आणणार असल्याचे राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री.राजेश क्षीरसागर यांनी सांगितले होते. त्यानुसार आज कोल्हापूर दौऱ्यावर आलेल्या मुख्यमंत्री नाम.मा.श्री.एकनाथजी शिंदे आणि उपमुख्यमंत्री नाम.मा.श्री.देवेंद्र फडणवीस यांच्यासमवेत राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री.राजेश क्षीरसागर यांनी खंडपीठ कृती समितीच्या शिष्ठमंडळाची भेट घडवून आणली. यावेळी खंडपीठ कृती समितीच्यावतीने मुख्यमंत्री नाम.मा.श्री.एकनाथजी शिंदे यांना खंडपीठाच्या मागणीचे निवेदन सादर करण्यात आले. यावेळी खंडपीठ हा प्रश्न जिव्हाळ्याचा असून, तातडीने मार्गी लावू, असे आश्वासित केले. यावेळी राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री.राजेश क्षीरसागर, खंडपीठ कृती समितीचे अॅड.महादेवराव आडगुळे, महाराष्ट्र गोवा बार कॉन्सीलचे सदस्य विवेक घाटगे, बार असोसिएशन अध्यक्ष अॅड.गिरीश खडके, सचिव विजय ताटे देशमुख, प्रकाश मोरे, प्रशांत चिटणीस आदी उपस्थित होते.  


Comments