शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघेंना अभिप्रेत काम नूतन पदाधिकाऱ्यांनी करावे : राजेश क्षीरसागर
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघेंना अभिप्रेत काम नूतन पदाधिकाऱ्यांनी करावे : राजेश क्षीरसागर
शिवसेनेच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा जाहीर सत्कार
कोल्हापूर दि.२८ सिटी न्यूज नेटवर्क
शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे साहेब आणि धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या आशीर्वादाने मुख्यमंत्री नाम.मा.श्री.एकनाथ शिंदे यांनी संपूर्ण राज्यात शिवसेनेची बांधणी करण्याचे आदेश दिले असून, कोल्हापूर जिल्हावासियांचे शिवसेनेस नेहमीच पाठबळ लाभले आहे. मुख्यमंत्री नाम.मा.श्री.एकनाथ शिंदे साहेब लोकहिताचे निर्णय घेत असून, त्याचे जनतेतून स्वागत होत आहे. त्यामुळे शिवसेनेत नव्याने सभासद नोंदणीसह पदाधिकारी नियुक्तीस वाढता प्रतिसाद मिळत आहे. नुकतीच शिवसेनेच्या कोल्हापूर जिल्हाप्रमुख पदी श्री.सुजित चव्हाण आणि श्री.रविंद्र माने यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्यासह महानगरप्रमुख पदी शिवाजी जाधव, महानगरसमन्वयक पदी जयवंत हारुगले, उपजिल्हाप्रमुख पदी किशोर घाटगे, शहरप्रमुख पदी रणजीत जाधव तर हॉटेल ७/१२ चे मालक श्री.राहुल सावंत यांची हातकणंगले तालुका प्रमुख पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघेंना अभिप्रेत समाजहिताचे आणि पक्षवाढीचे काम नवनियुक्त पदाधिकाऱ्यांनी करावे, असे आवाहन राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री.राजेश क्षीरसागर यांनी केले. शिवसेनेच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा जाहीर सत्कार राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आणि जिल्हाप्रमुख सुजित चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी बोलताना राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री.राजेश क्षीरसागर यांनी, नवनियुक्त पदाधिकारी हे शिवसेनेच्या स्थापनेपासूनचे पदाधिकारी असून, शिवसेनेचे कट्टर निष्ठावंत शिवसैनिक आहेत. शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचे हिंदुत्वाचे विचार आणि ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण या सूत्रानुसार आजपर्यंत शिवसेनेचे अखंडीत काम करत आहेत. शिवसेनेत झालेल्या क्रांती नंतर मुख्यमंत्री नाम.मा.श्री.एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेची घोडदौड सुरु असून, लोकहिताच्या निर्णयाचे स्वागत जनतेतून होत आहे. मुख्यमंत्री ना.मा.श्री.एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली कोल्हापूर जिल्ह्याचा विकास करण्यास आपण कटिबद्ध असून, जनतेला न्याय देण्याचे काम नवनियुक्त पदाधिकाऱ्यांनी करावे. आगामी काळात उर्वरित प्रमुख पदांसह उप-शहरप्रमुख, विभागप्रमुख, महिला आघाडी, युवासेना आदी सर्वच अंगीकृत संघटनावर पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करून, निष्ठावंत शिवसैनिकांना न्याय देण्यात येणार असल्याचे राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री.राजेश क्षीरसागर यांनी सांगितले.
यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख सुजित चव्हाण, मा.परिवहन सभापती राहुल चव्हाण, संयज संकपाळ, सुनील जाधव, दीपक चव्हाण, सुनील खोत, अश्विनी शेळके, मंदार तपकिरे, विश्वदीप साळोखे, विश्वजित चव्हाण, अंकुश निपाणीकर, अर्जुन आंबी, कपिल नाळे, राज कापसे, रियाज बागवान, निलेश हंकारे, सुरेश माने, आकाश सांगावकर, राज अर्जुनीकर, श्रीकांत मंडलिक आदी शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.
Comments
Post a Comment