शहीद वीरपत्नी लक्ष्मी महाविद्यालयात विद्यार्थ्यांनींचे 'ढिंच्यॅक' स्वागत

 शहीद वीरपत्नी लक्ष्मी महाविद्यालयात विद्यार्थ्यांनींचे 'ढिंच्यॅक' स्वागत




कोल्हापूर तिटवे १९--सिटी न्यूज नेटवर्क

           मनसोक्त धम्माल करण्याचं आणि त्यांत सीनिअर्सनीही आपल्या वाटची मजा करून घेण्याचं निमित्त म्हणजे महाविद्यालयातील 'फ्रेशर्स पार्टी'. अशाच फ्रेशर्स पार्टीतून तिटवे (ता. राधानगरी) येथील शहीद वीरपत्नी लक्ष्मी महाविद्यालयात नवोदित विद्यार्थिनींचे स्वागत मोठ्या उत्साहात करण्यात आले. भन्नाट थीम, डीजेच्या ठोका, कॅटवॉक, डान्स आणि वेगवेगळ्या फनी गेम्समुळे विद्यार्थिनींनी या पार्टीत धम्माल केली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रशांत पालकर होते. 

याप्रसंगी प्राचार्य प्रशांत पालकर प्रथम वर्षातील विद्यार्थिनींचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. येत्या शैक्षणिक कारकिर्दीसाठी आणि भविष्यातील यशासाठी विद्यार्थिनींना त्यांनी शुभेच्छा दिल्या. वेगवेळ्या खेळांमध्ये विद्यार्थिनींनी सहभाग घेतला. डीजेच्या ठेक्यावर डान्स करत विद्यार्थिनींनी कार्यक्रमाची मजा लुटली. 

              शहीद महाविद्यालयामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील 110 गावांमधील 900 हून अधिक विद्यार्थिंनी शिक्षण घेत आहेत. येथे पारंपारिक शिक्षणाऐवजी कंम्प्युटर सायन्स, मास मीडिया, डी. एम. एल. टी., बी.एस्सी मायक्रोबायोलॉजी, फूड सायन्स अँड न्यूट्रिशन, एम.एस्सी कम्प्युटर सायन्स, एम.एस्सी मायक्रोबायोलोजी, एम.एस्सी रसायनशास्त्र असे आधुनिक, व्यावसायिक व रोजगाराभिमुख अभ्यासक्रम शिकवले जातात. त्यामुळेच परीक्षेपूर्वीच विद्यार्थिनींना मोठमोठ्या कंपन्या मधून नोकरीच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. महाविद्यालयाच्या विविध विभागातील विद्यार्थिनी टी.सी.एस., कॅप्जेमिनी सारख्या मल्टीनॅशनल कंपनीमध्ये काम करत आहेत. संस्थेचे शहीद पब्लिक स्कूल गेल्या अनेक वर्षापासून कार्यरत आहे. विद्यानिकेतन गुणवत्ता शिष्यवृत्तीच्या माध्यमातून शहीद पब्लिक स्कूलने अनेक इंजिनियर्स ,डॉक्टर्स व विविध क्षेत्रातील यशवंत घडविले आहेत. त्यामुळे केजीपासून ते पीजीपर्यंत अभ्यासक्रम उपलब्ध असलेले एक अतिशय सुरक्षित व आधुनिक तंत्रज्ञानाने युक्त असे शैक्षणिक संकुल शहीद परिवाराने तिटवे सारख्या खेडेगावात उभे केले आहे.

              याप्रसंगी संगणकशास्त्र विभागप्रमुख प्रा. सागर शेटगे, मास मीडिया विभागप्रमुख प्रा.दिग्विजय कुंभार, शिक्षकवृंद आणि विद्यार्थीनी उपस्थितीत होत्या. सूत्रसंचालन साक्षी गुरव आणि तृप्ती उणे यांनी केले. आभार प्रा.सागर शेटगे यांनी मानले.

Comments