इचलकरंजीच्या शौकत बागवान स्मृती एकदिवशीय जलद बुद्धीबळ स्पर्धेत सांगलीचा आंतरराष्ट्रीय मास्टर समीर कठमाळे विजेता
इचलकरंजीच्या शौकत बागवान स्मृती एकदिवशीय जलद बुद्धीबळ स्पर्धेत सांगलीचा आंतरराष्ट्रीय मास्टर समीर कठमाळे विजेता तर रेंदाळचा श्रीराज उपविजेता कोल्हापूरचा आदित्य तृतीय
इचलकरंजी दि.29 सिटी न्यूज नेटवर्क
मराठा सांस्कृतिक मंडळ, तांबे माळ, इचलकरंजी येथे इचलकरंजी इलेक्ट्रिक कॉन्टॅक्टर्स असोसिएशनने आयोजित केलेल्या हाजी शौकत बागवान स्मृती खुल्या एक दिवशी जलद बुद्धिबळ स्पर्धा उत्साहात संपन्न झाल्या.अंतिम नवव्या फेरीत पहिला पटावर अग्रमानांकित सांगलीच्या समीर कठमाळे विरुद्ध जेजुरीचा हर्षल पाटील यांच्यातील डावात हर्षल ने लक्षवेधक खेळ करीत समीरला बरोबरीत रोखले परंतु समीरला अजिंक्यपदापासून कोणी रोखू शकले नाही.नऊ पैकी आठ गुण व सरस टायब्रेक गुणाधारे समीरने विजेतेपद पटकावले तर आठ गुण मिळवणाऱ्या हर्षलला कमी टायब्रेक गुणामुळे चौथ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले.समीरला रोख आठ हजार रुपये व चषक देऊन गौरवण्यात आले तर हर्षलला रोख पाच हजार रुपये देऊन सन्मानित केले.दुसऱ्या पटावर रेंदाळच्या श्रीराज भोसलेने मिरजेच्या मुद्दसर पटेलला पराभूत करून आठ गुणांसह उपविजेतेपद मिळविले.त्याला रोख सात हजार रुपये व चषक देऊन गौरविले.तिसऱ्या पटावर कोल्हापूरच्या आदित्य सावळकरने इचरकंजीच्या तन्मय पवार वर मात करीत आठगुणासह तृतीय स्थान मिळवत रोख सहा हजार रुपये व चषकाचे बक्षीस पटकाविले.चौथ्या पटावर इचलकरंजीच्या रवींद्र निकमने कोल्हापूरच्या तुषार शर्माला हरवून आठ गुणांसह पाचवे स्थान मिळविले.रवींद्रला रोख चार हजार रुपयाचे बक्षीस मिळाले.
या स्पर्धेत उत्स्फूर्त विक्रमी संख्येने 286 बुद्धिबळपटू सहभागी झाले होते.मुंबई, पुणे, रत्नागिरी,सातारा सोलापूर, बेळगाव, निपाणी, सांगली, कोल्हापूर व स्थानिक इचलकरंजी येथील नामवंत बुद्धिबळपटू स्पर्धेत सहभागी होते.सांगलीचा आंतरराष्ट्रीय मास्टर समीर कटमाळेसह 87 आंतरराष्ट्रीय गुणांकन प्राप्त बुद्धिबळपटू या स्पर्धेत सहभागी झाले आहेत.या स्पर्धेचा बक्षीस समारंभ MSEDCL सातारा विभागाचे कार्यकारी अभियंता सागर मारुलकर साहेब व इचलकरंजी विभागाचे कार्यकारी अभियंता प्रशांत राठी साहेब यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी इचलकरंजी इलेक्ट्रिक कॉन्टॅक्टर असोसिएशनचे अध्यक्ष शेखर दरीबे, उपाध्यक्ष महेश कोरवी, शाहू पवार, अनंत माळी,अमर पुजारी,अभिनंदन खटावने,परसू हरवंदे,विनायक बडवे व आंतरराष्ट्रीय पंच भरत चौगुले, मनीष मारुलकर, करण परीट, जयश्री पाटील,आरती मोदी, रोहित पोळ, अक्षय पाटील, शाहरुख कुरणे इत्यादी उपस्थित होते.
78600/- रुपयाची रोख बक्षिसेसह चषक व पदक बक्षीस म्हणून वितरित करण्यात आले.खुल्या गटामध्ये मुख्य 20 बक्षिसे व विविध वयोगटांतील उत्तेजनार्थ 84 बक्षिसे अशी एकूण 104 बक्षीसांचे वितरण केले.
इतर बक्षीस विजेते पुढीलप्रमाणे
सहावा ) गिरीश बाचीकर बेळगाव, सातवा प्रतीक मुळे पुणे,आठवा दिव्या पाटील जयसिंगपूर,नववा)साहिल सेजल पुणे,दहावा तन्मय पवार इचलकरंजी,अकरावा मुद्दसर पटेल मिरज बारावा रोहित मोकाशी सांगली, तेरावा अभिषेक बेलगाव,चौदावा तुषार शर्मा कोल्हापूर,पंधरावा प्रणव पाटील कोल्हापूर,सोळावा दर्शन मगदूम सिदनाळ सतरावा अनिकेत बापट सातारा अठरावा , शिवप्रसाद कोकणे मिरज एकोणिसावा शुभम कांबळे फलटण,विसावा ओंकार सावर्डेकर चिपळूण.
Comments
Post a Comment