दैनिक राशिभविष्य

 बुधवार, २४ ऑगस्ट २०२२. 







श्रावण कृष्ण द्वादशी/त्रयोदशी, दक्षिणायन, शुभकृतनाम संवत्सर. राशिभविष्य - ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. (संपर्क - 8087520521)


राहुकाळ - दुपारी १२.०० ते दुपारी १.३० 


"आज अनिष्ट दिवस, *प्रदोष* आहे." 


चंद्र नक्षत्र - पुनर्वसू/पुष्य 


मेष:- चंद्राचा मंगल आणि बुधाशी लाभ योग आहे. फलदायक दिवस आहे. जमिनीची कामे मार्गी लागतील.  गृहसौख्य लाभेल.  

     

वृषभ:- मान सनामन मिळतील. प्रतिष्ठा वाढेल. सहकार्य मिळेल. कामे पुढे सरकतील.

 

मिथुन:- अनपेक्षित लाभ होतील. संधीचा फायदा घ्या, गुंतवणूक करा. 


कर्क:- महत्वाची कामे करा. आप्त भेटतील. छोटी सहल घडेल. मौज कराल.

 

सिंह:- संमिश्र दिवस आहे. काही शुभ घटना घातली. मात्र खर्च वाढेल.

  

कन्या:- उत्तम दिवस आहे. कामे मार्गी लागतील. उत्साह वाढेल. मौल्यवान वस्तू सांभाळा.

 

तुळ:- सौख्य लाभेल. कामाच्या ठिकाणी मन रमेल. मित्र मंडळी भेटतील.

 

वृश्चिक:- कठोर निर्णय घ्याल. येणी वसूल होतील. कायदे काटेकोर पालन करा. 


धनु:- संमिश्र दिवस आहे. काळजी घ्या. आराम करा. आरोग्य सांभाळा.

 

मकर:-  विवाह इच्छुकांना खुशखबर मिळेल. स्पर्धा जिंकाल. प्रेमात यश मिळेल.

 

कुंभ:- पूर्वार्ध अनुकूल आहे. मौज कराल. आर्थिक प्राप्ती चांगली होईल.  व्यवसायात वाढ होईल.  

 

मीन:- नवीन खरेदी होईल. छोटी सहल घडेल. इलेक्ट्रॉनिक वस्तू घ्याल. संवाद साध्य होईल. 

 


(कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, 'राशीभाव' या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी -  8087520521)

Comments