शाहुपुरी परिसरात प्रथमच दहीहंडीचे आयोजन
कोल्हापूर 19 सिटी न्यूज नेटवर्क
गोकुळ अष्टमीच्या निमित्ताने शहरात दोन वर्षांनी मोठ्या प्रमाणात ठिकठिकाणी दहीहंडीचे आयोजन केले होते शाहुपुरी येथे गणेश मित्र मंडळ शाहुपुरी १ली गल्ली आणि संयुक्त शाहुपुरी यांनी मा विनायक चौक शाहुपुरी येथे दहीहंडीचे आयोजन केले होते शाहुपुरीत प्रथमच दहीहंडीचा कार्यक्रम असल्याने परिसरातील नागरिकांनी गर्दी केली होती विशेषतः महिला वर्ग आणि मुलें मुली उपस्थित होत्या
दहीहंडी फोडण्यासाठी कुठे वाडी गोविंद पथक.जय महाराष्ट्र पथकं शिरोळ शिवगर्जना पथकं तासगाव यांनी हजेरी लावून सलामी दिली अखेरीस शिवगर्जना पथकाने सहा थर लावून दहीहंडी फोडली अत्यंत थरारक खेळाचा अनुभव उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात व्यक्त केला यावेळी भागातील प्रतिष्ठित नागरिक अरुण जोशी दिलीप शेटे नरेंद्र पाटील गिरीश साटम राजेंद्र पाटील मुन्ना पुरेकर यांचेसह व्यापारी उपस्थित होते
या कार्यक्रमाचे आयोजन दिगंबर जाधव शिवरुप शेटे निरंजन डुणुंग राहुल डुणुंग अनिल कापसे आकाश टिक्के सुरज वर्धमाने यांनी केले
Comments
Post a Comment