"गणपती बाप्पा मोरया"च्या गजरात घरगुती "श्री"चे जल्लोषी वातावरणात आगमन

 

"गणपती बाप्पा मोरया"च्या गजरात घरगुती  "श्री"चे जल्लोषी वातावरणात आगमन 



 
कोल्हापूर ३१ : सिटी न्यूज नेटवर्क
               ‘गणपती बाप्पा मोरया’चा जयघोष... ढोल-ताशा या पारंपरिक वाद्यांचा ताल, फटाक्यांची आतषबाजी, सुरेख आराशीची मांडणी, आरती, धूप-दीपाने आलेला भक्तीचा सूर, गणरायाची सुरेल गाणी, खीर-मोदकासह सुग्रास नैवेद्य अशा जल्लोषात आज घरोघरी प्रथमपूज्य, बुद्धिदाता, विघ्नहर्त्या मंगलमूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली. यानिमित्ताने अवघे कोल्हापूर  आपल्या लाडक्या बाप्पाच्या भक्तीत रंगून गेले होते.


ज्याच्या आगमनाची भक्त गेले वर्षभर वाट पाहत होते, आठ दिवसांपासून ज्याच्या स्वागताची जय्यत तयारी सुरू होती, नावीन्यपूर्ण आणि कलात्मक संकल्पनांना बहर आला होता, अशा या आबालवृद्धांच्या आवडत्या गणपती बाप्पाच्या प्रतिष्ठापनेचा दिवस गुरुवारी उगवला. गणेश चतुर्थीचा मुहूर्त साधून देव आज घरोघरी येणार होता. त्यामुळे गुरुवारचा दिवस उजाडला तो भल्या पहाटे. घरादाराची झाडलोट झाली, अंगणात सप्तरंगांनी रांगोळी सजली, काही ठिकाणी फुलांचीच आरास आणि पायघड्या तयार झाल्या.

Comments

  1. गणपती बाप्पा मोरया

    ReplyDelete

Post a Comment