राजकारणा पलीकडचे शरद पवार समजून घेण्यासाठी महाराष्ट्रातील दिग्गज शंभर विचारवंतानी अक्षर वेध घेतलेला ' 2 सिल्व्हर ओक ' हा संदर्भ मूल्य असलेला ग्रंथ - प्रकाशन

 राजकारणा पलीकडचे शरद पवार समजून घेण्यासाठी महाराष्ट्रातील दिग्गज शंभर विचारवंतानी अक्षर वेध   घेतलेला ' 2 सिल्व्हर ओक ' हा  संदर्भ मूल्य  असंलेला ग्रंथ  - प्रकाशन



  कोल्हापूर ३० सिटी न्यूज नेटवर्क

महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदापासून केंद्रातील कृषी -  संरक्षण मंत्री हे शरद पवार सर्वांना परिचित आहेत . मात्र त्या पलीकडे जाऊन विविध 100 पैलूंनी शरद पवारांचा महाराष्ट्रातील दिग्गज आणि वेद घेतलेले शरद पवार आणि त्यांचे अप्रकाशित कार्यकर्तृत्वाचा वेध दुर्गा  पब्लिकेशनच्या 2 सिल्वर ओक  या 702 पानी  ग्रंथातून नेमकेपणे उघडले असून हा एक मराठी साहित्य विषयातील वेगळा आगळा आणि विक्रमी प्रयोग ठरेल आणि ठरावा अशा शब्दात विविध मान्यवरांनी आपल्या भावना व्यक्त केल्या .  येथील दसरा चौकातील शाहू स्मारक भावनांमध्ये या ग्रंथाची अगदी सव्वा महिन्यातील सहाव्या आवृत्ती चे  श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांच्या अध्यक्षतेखाली आणि नाबार्डचे माजी  अध्यक्ष - रयत शिक्षण संस्थेचे व्यवस्थापकीय समिती सदस्य डॉ .  यशवंत थोरात यांच्या शुभहस्ते प्रकाशित झाले . यावेळी व्यासपीठावर माजी मंत्री हसन मुश्रीफ -  सतेज पाटील यांच्यासह आमदार पी.एन . पाटील ,  तासगाव च्या  आमदार सुमन आर . आर. पाटील शिराळ्याचे आमदार मानसिकराव नाईक चंदगडचे आमदार राजेश पाटील यांच्यासह  माई पाटील आणि प्रकाशक दुर्गा पब्लिकेशनचे दत्ता पवार आदी मान्यवर उपस्थित होते .  प्रारंभी सर्वांचे स्वागत करत गेले  अडीच ते तीन वर्षाच्या अथक  परिश्रमातून हा 2 सिल्व्हर ओक  ग्रंथ पूर्ण होत असल्याचे आणि त्यासाठी चांद्यापासून बांद्यापर्यंतच्या अनेक दिग्गजांनी आपले अक्षर विचार नोंदवल्याचे व ते सर्वानाच मार्गदर्शक ठरतील असे  दुर्गा पब्लिकेशनचे संपादक दत्ता पवार यांनी नमूद केले .    त्यांनंतर थोराता सह मान्यवरांच्या हस्ते ग्रंथाचे प्रकाशन झाले



 .         माजी मंत्री हसन  मुश्रीफ यांनी यावेळी मनोगत व्यक्त करताना 'महाराष्ट्राच्या समाजकारणाच्या आणि राजकारणाच्या क्षेत्रात सक्रीय  असलेल्या सर्वांनाच हा 2 सिल्व्हर ओक  ग्रंथ नक्कीच एक अभ्यासनीय  आणि संदर्भ मूल्य म्हणून मोलाचा  ठरेल आणि प्रत्येक कार्यकर्त्यांनी तो वाचावा - प्रत्येक संस्थेमध्ये तो असावा यासाठी आपण आग्रहाने नियोजन प्रयोग प्रयत्न करू असे  त्यांनी आपल्या भाषणात नमूद केले .      नाबार्डमध्ये जबाबदारीने जबाबदारीच्या पदावर करत असताना आणि सहकार क्षेत्रात विषयी महत्वाचा  अहवाल सादर करताना आपल्याला वेळोवेळी शरद पवार यांची अगदी मोलाची मदत झाली . यासह  मित्र आणि मॉन्टर म्हणूनही शरद पवार मला नेहमीच जवळ चे आहेत व राहतील असे भावपुर्ण मनोगत  डॉ .  यशवंत थोरात यांनी यावेळी काढले .    

            इतिहास संशोधक जयसिंगराव पवार  यांनी ' राजर्षि  शाहू महाराज यांच्या सामाजिक समरसतेच्या आणि आरक्षणाच्या क्रांतिकारी निर्णयाचा वसा आणि वारसा महिलांना राजकारणात आरक्षण देऊन शरद पवार यांनी अधिक व्यापक  केला आहे आणि त्यांचे हे योगदान कोणी ही  नाकारू शकत नाही अशा शब्दात आपले विचार मांडले .                 'एक नेहमीच मदतीला धावणारा आपला बंधू  शरद पवार यांच्या हे व्यक्ती पलिकडे समष्टीमय बनलेले व्यक्तीमत्व आहे असे नमूद करत सरोज तथा  माई पाटील विविध कौटुंबिक आठवणी सांगितल्या .   अध्यक्षीय  समारोप करताना श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांनी '  आगामी काळात शरद पवार यांना सर्व पैलूनी  समजून घेण्यासाठी तब्बल सातशे पानी 2  सिल्व्हर ओक हा अक्षर धन  ग्रंथ नक्कीच मोलाची भूमिका पार पाडेल  अशा शब्दातआपल्या शुभेच्छा व्यक्त केल्या . या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पंडित कंदले यांनी केले . आभार व्यक्त करताना माजी महापौर आर . के . पोवार यांनी महाराष्ट्रासह इतर राज्यातील  औधोगिक, शैक्षणिक,कला, क्रीडा, सांस्कृतिक,आरोग्य,माध्यम विश्वातील १०० व्यासंगी दिग्गज मान्यवरा सह या पुस्तकात शास्त्रज्ञ रघुनाथ माशेलकर,डॉ. अनिल काकोडकर,डॉ. विजय भाटकर,किरण मुजुमदार,सुशीलकुमार शिंदे,देवेंद्र फडणवीस, सरकारी वकील उज्वल निकम,राजाभाऊ लिमये,रामशेठ ठाकूर,शांतीलाल मुथा, उद्योगपती बाबा कल्याणी, अरुण फिरोदिया,विश्वास चितळे,इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार, दै. सकाळचे प्रतापराव पवार- श्रीराम पवार,दै. लोकमतचे विजय दर्डा - वसंत भोसले,दिग्दर्शक जब्बार पटेल,क्रीडा समीक्षक द्वारकानाथ संझगिरी  सह विविध दिगज्जांनी नेमकेपणे अक्षरवेध  घेतलेल्या या ग्रंथाचे सर्वानी वाचन - मनन करावे  असे आहवान केले . या सोहळया स  संयोजन जिल्हाध्यक्ष ए . वाय. पाटील ,  व्ही. बी. पाटील , अनिल घाडगे ,राजू जमादार, जाहिदा मुजावर,  पूजा साळुंखे ,शितल तिवडे ,  महेंद्र चव्हाण, निहाल कलावंत ,सुनील देसाई , राजीव जमादार ,प्रमोद माळकर डॉ .  सुनील पाटील , राजु लाटकर , माजी महापौर महादेवराव आडगुंळे जयकुमार शिंदे सह राजकीय  सामाजिक - सांस्कृतिक - शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते .


Comments