वरिष्ठ महिला जिल्हा निवड बुद्धिबळ स्पर्धेत जयसिंगपूरची दिव्या पाटील अजिंक्य तर कोल्हापूरच्या शर्वरी कबनूरकर उपविजेतेपद

 वरिष्ठ महिला जिल्हा निवड बुद्धिबळ स्पर्धेत जयसिंगपूरची दिव्या पाटील अजिंक्य तर कोल्हापूरच्या शर्वरी कबनूरकर उपविजेतेपद




कोल्हापूर दि. 25 सिटी न्यूज नेटवर्क

 येथील कोल्हापूर जिल्हा बुद्धिबळ संघटनेच्या हॉलमध्ये , कोल्हापूर केस अकॅडमीने आयोजितत केलेल्या चेस असोसिएशन कोल्हापूरने आयोजित केले केलेल्या वरिष्ठ महिला कोल्हापूर जिल्हा संघ निवड बुद्धिबळ स्पर्धेत आगमनांकित जयसिंगपूरची दिव्या पाटील अंतिम पाचव्या फेरीत, कोल्हापूरच्या महिमा शिर्केचा पराभव करून पाच पैकी चार गुण मिळवून सरस टायब्रेक गुणाधारे अजिंक्यपद पटकावले.कोल्हापूरच्या शर्वरी कबनूरकरने मानांकित जयसिंगपूर च्या दिशा पाटील ला पराभवाचा धक्का देत चार गुणासह उपविजेतेपद मिळविल पराभूत दिशा पाटील ला साडेतीन गुणासह तिसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले.कोल्हापूरची तृप्ती प्रभू ने कोल्हापूरच्या सृष्टी कुलकर्णीचा वर विजय मिळवून साडेतीन गुणासह चौथे स्थान प्राप्त केले.कोल्हापूरची महिमा शिर्के व नांदणीच्या संस्कृती सुतार ने अनुक्रमे पाचवे व सहावे स्थान मिळविले. पहिलाया सहा क्रमांकांना रोख बक्षीस देऊन गौरवण्यात आले. उत्तेजनार्थ बक्षिसे :- सात वर्षाखालील उत्कृष्ट बुद्धिबळपटू सांची चौधरी इचलकरंजी व अकरा वर्षाखालील उत्कृष्ट बुद्धिबळपटू 1) अरिना मोदी कोल्हापूर 2)सिद्धी बुबने जयसिंगपूर

स्पर्धेचा बक्षीस समारंभ विरासात फाउंडेशनच्या ज्येष्ठ रंगकर्मी प्रसाद जमदग्नी,शिल्पा पुसाळकर,प्राध्यापक मीना ताशेलदर व कोल्हापूर जिल्हा शिवसेना महिला आघाडीच्या उप जिल्हा प्रमुख स्मिता सावंत यांच्या हस्ते करण्यात आला.यावेळी आंतरराष्ट्रीय पंच भरत चौगुले, मनीष मारुलकर, धीरज वैद्य, प्रीतम घोडके आरती मोदी व राजेंद्र मकोटे उपस्थित होते.

आठ ते बारा्टोबर दरम्यान ऑक्टोंबर दरम्यान औरंगाबाद येथे होणाऱ्या वरिष्ठ महिला राज्य निवड बुद्धिबळ स्पर्धेसाठी निवडण्यात आलेला कोल्हापूर जिल्ह्याचा संघ पुढीलप्रमाणे

1) दिव्या पाटील जयसिंगपूर 2) शर्वरी कबनूरकर कोल्हापूर 3) दिशा पाटील जयसिंगपूर 4) तृप्ती प्रभू कोल्हापूर.

Comments