भारताचा ऑस्ट्रेलियावर रोमहर्षक विजय

 

भारताचा ऑस्ट्रेलियावर रोमहर्षक विजय, रोहित शर्मा ठरला हीरो


नागपूर २४ सिटी न्यूज नेटवर्क

भारताने ऑस्ट्रेलियावर 6 विकेटने विजय मिळवत मालिकेत 1-1 अशी बरोबरी केली आहे. रोहित शर्माने शानदार 46 धावा ठोकल्या


ऑस्ट्रेलियाने भारतासमोर  विजयासाठी 8 ओवरमध्ये 91 धावांचं आव्हान दिलं होतं. मात्र, कर्णधार रोहित शर्माने 20 चेंडूत 46 धावा करत आपल्या संघाला विजय मिळवून दिला.

मोहालीत पहिल्या ट्वेंटी ट्वेंटी सामन्यात भारताचा पराभवाचा सामना करावा लागला होता. 

 नागपूर येथील मैदानावर पुन्हा ऑस्ट्रेलियाविरुद्ध उतरला. मात्र, पावसामुळे खेळ विलंबाने सुरू झाला. त्यामुळे ही लढत केवळ 8 ओवरची झाली. टीम इंडियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. ऑस्ट्रेलियाने टीम इंडियासमोर विजयासाठी 91 धावांचे आव्हान दिले होते.  मात्र, कर्णधार रोहित शर्मा याने 20 चेंडूत 46 धावांचे योगदान देऊन आपल्या संघाला विजय मिळवून दिला.

Comments