कोल्हापूरचा अनिश गांधी विजेता तर श्रीराज भोसले उपविजेता


कोल्हापूरचा अनिश गांधी विजेता तर  श्रीराज भोसले उपविजेता





कोल्हापूर २६ सिटी न्यूज नेटवर्क

कोल्हापूर जिल्हा बुध्दिबळ संघटनेच्या मान्यतेने युवक

मित्र मंडळ , कोल्हापूर  आयोजित कै. प्रमोद भोसले स्मृती खुल्या बुध्दिबळ स्पर्धेला खरे मंगल कार्यालयाच्या सभागृहात सुरूवात झाली.

या स्पर्धेचा उद्घाटन  समारंभ  कोल्हापूरची महिला ग्रॅण्डमास्टर मा. ऋचा पुजारी , व मा. शतावरी भोसले ,मा. महेश्वर भोसले सामाजिक कार्यकर्ते ॲड्. बाबा इंदूलकर  यांच्याहस्ते पटावरील चाल खेळून, दिपप्रज्वलन  व प्रतिमापूजन करून  करण्यात आले. यावेळी ऋचा पुजारी हिचा महेश्वर भोसले व सोहम खासबारदार यांच्याहस्ते स्मृतीचिन्ह व गुलाब रोप देऊन सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक व परिचय सोहम खासबारदार यांनी केले. आपल्या उद्घाटनपर भाषणात ऋचाने आयोजित केलेल्या स्पर्धेबद्दल कौतुकोद्गार काढले व खेळाडूंना शुभेच्छा दिल्या.



या स्पर्धेला कोल्हापूर , सांगली, सातारा, पुणे , इचलकरंजी, निपाणी , बेळगांव , मिरज  आदि  शहरातील 254 खेळाडू  सहभागी झाले आहेत प्रथम मानांकन मिरजेच्या मुदस्सर पटेल याला देण्यात आले. अनिश गांधी , आदित्य सावळकर, दिव्या  व दिशा पाटील, ओकांर कडव, निहाल मुल्ला,श्रीराज भोसले, अभय भोसले, अनिकेत बापट, प्रणव पाटील,शार्विल पाटील, सचिन मोहिते, डी. आर. पाटील, रविंद्र निकम, सदानंद चोथे याच्यासह 84 आंतरराष्ट्रीय मानांकन प्राप्त खेळाडूंचा सहभाग आहे. 



नवव्या फेरीत सातारचा ओंकार कडव व कोल्हापूरचा अनिश गांधी यांच्यातील डावात दोघांनी डाव बरोबरीत सोडविला अर्ध्या गुणासह अनिशने 8.5 गुण मिळवून रू. 5000/- च्या रोख पारितोषिकासह कै. प्रमोद भोसले चषक पटकाविला तर ओंकारला 7.5 गुणासह रू. 1000/- च्या रोख पारितोषिकासह  पाचव्या स्थानावर जावे लागले.

रेंदाळच्या श्रीराज भोसलेने कोल्हापूरच्या सोहम खासबारदारचा पराभव करून 8 गुणासह रू. 3000/- च्या रोख पारितोषिकासह उपविजेतेपद पटकाविले तर सोहमला 7 गुणासह रू. 600/- च्या रोख पारितोषिकासह अकराव्या स्थानावर समाधान मानावे लागले.

कोल्हापूरचा आदित्य सावळकर व सांगलीचा विक्रमादित्य चव्हाण यांच्यातील डावात आदित्यचा विक्रमादित्यने 30 व्या चालीला पराभव करून 8 गुणासह रू. 2000/- च्या रोख पारितोषिकासह तिसरे स्थान पटकाविले. आदित्यला 7 गुणासह रू. 800/- च्या रोख पारितोषिकासह आठव्या स्थानावर जावे लागले,

नवव्या फेरीअखेर गुण –

 1) अनिश गांधी ( कोल्हापूर )– 8.5

2) श्रीराज भोसले ( रेंदाळ )– 8

3) विक्रमादित्य चव्हाण ( सांगली ) – 8

4) प्रणव पाटील ( कोल्हापूर )– 8

5) ओंकार कडव ( सातारा )-7.5

6) मुदस्सर पटेल ( मिरज )-7.5

7) निहालअहमद मुल्ला ( कोल्हापूर)-7

8) आदित्य सावळकर ( कोल्हापूर)-7

9) संतोष सरीकर ( इस्लामपूर)-7

10) शार्विल पाटील ( कोल्हापूर )-7

11) सोहम खासबारदार ( कोल्हापूर )-7

12) सदानंद चोथे ( सांगली )- 7

13) अपूर्व देशमुख ( सातारा)- 7

14) रविंद्र निकम ( इचलकरंजी )-7

15) तन्मय पवार ( सातारा )-6.5

16 ) तृप्ती प्रभू ( कोल्हापूर )-6.5

17 ) अंलकार कांबळे ( रत्नागिरी )-6.5

18) प्रदीप आवाडे ( कोल्हापूर )-6.5

19) सचिन मोहिते ( सातारा)-6.5

20 ) खान रईस अहमद ( बेळगांव )-6

उत्कृष्ठ 9 वर्षाखालील – 1) शौर्य बागडीया , 2) हित बलदवा ,3) रियाथ पोदार ,4) आशिष मोठे , 5) विवान सोनी , 6) कश्यप खाकंरीया , 7) आराध्य ठाकूरदेसाई, 8) सार्थक जाधव,

9) सहर्ष ठोकळे, 10) आर्णव पाटील

उत्कृष्ठ 13 वर्षाखालील – 1) हर्ष घाडगे , 2) दिशा पाटील , 3) अरीन कुलकर्णी , 

4) ईश्वरी जगदाळे, 5) व्यंकटेश खाडेपाटील , 6) ईशान कुलकर्णी , 7) स्वरूप साळवे,

8) अथर्व तावरे, 9) आदित्य चव्हाण , 10) अभय भोसले

उत्कृष्ठ 17 वर्षाखालील – 1) वरद आठल्ये , 2) ऋषीकेश कबनूरकर , 3) आदित्य खैरमोडे, 4) शर्वरी कबनूरकर , 5) सारंग पाटील , 6) गुरूराज धोंगडे , 7) शंतनू पाटील, 8) केऊर साखरे , 9) धैर्यशील सरनोबत  10) आयुष पाटील 

उत्कृष्ठ महिला खेळाडू – 1) दिव्या पाटील , महिमा शिर्के

उत्कृष्ठ ज्येष्ठ खेळाडू – 1) बी.एस. नाईक , 2) राजू सोनेचा

उत्कृष्ठ चँलेज खेळाडू – 1) अभिजीत कांबळे , 2) महेश पाटील

उत्कृष्ठ अँकॅडमी – 1) के.पी.चेस ॲकॅडमी, सांगली,2) केन चेस इचलकरंजी, 3) ब्रिलीयंट सातारा, 

उत्कृष्ठ स्कूल – 1) चाटे स्कूल, 2) आर.एस. इ. एम. स्कूल , 3) पोदार , कोल्हापूर

माजी गृहराज्यमंत्री  सतेज पाटील यांनी भेट देऊन खेळाडूंना शुभेच्छा दिल्या. या स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ मा. कृष्णराज महाडीक , महेश्वर भोसले, श्रीमती भोसले, बी.एस. नाईक , आंतरराष्ट्रीय पंच भरत चौगुले यांच्याहस्ते संपन्न झाला.

 या स्पर्धेचे पंच म्हणून आंतरराष्ट्रीय पंच भरत चौगुले , फिडे पंच शार्दुल तपासे, दिपक वायचळ , आनंदिता प्रदीप , रोहित पोळ, शाहरूख कुरणे  तर सहाय्यक म्हणून आनंदी खासबारदार ,सचिन पवार यांनी काम पाहिले.

Comments