कोल्हापुरातील सर्वात मोठी गोधडी बनवण्याचा उपक्रम

 कोल्हापुरातील सर्वात मोठी गोधडी बनवण्याचा उपक्रम 




कोल्हापूर २७ सिटी न्यूज नेटवर्क 


संस्कार शिदोरी मंच वतीने 1 हजार महिलांच्या सहभागातून, विणकामातून 21 फूट बाय 21 फूट ची महागोधडी बनवण्याचा उपक्रम करण्यात आला . येत्या 30 तारखेला सकाळी 8 वाजता महागोधडी सोबत कुंकुमार्चन सोहळा होणार असून त्यानंतर दुपारी 2 पर्यन्त गोधडी दर्शन सर्वांसाठी खुले असणार आहे. त्यानंतर ठीक 3 वाजता महा गोधडी अर्पण शोभायात्राची सुरवात मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार आहे. ही शोभा यात्रा छत्रपती शिवाजी मंदिर ते मिरजकर तिकटी ते भवानी मंडप पर्यन्त असून तिथून महागोचडी 5 महिलांच्या उपस्तिथीत गरुड मंडपात देवस्थान समिती कडे अर्पण करण्यात येईल. असे संस्कार शिदोरी मंच च्या स्मिता खामकर यांनी आज माहिती दिली .







Comments