सेवा पंधरवडा अंतर्गत प्राथमिक आरोग्य तपासणी शिबिर सम्पन्न .....

 सेवा पंधरवडा अंतर्गत प्राथमिक आरोग्य तपासणी शिबिर सम्पन्न 




कोल्हापूर २७ सिटी न्यूज नेटवर्क 


     देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या वाढदिवसा निमित्त व राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जंयती निमित्त सेवा पंधरवडा आयोजन महा.एन.जी.ओ फेडरेशन महाराष्ट्र व शेखरजी मुंदडा यांच्या संकल्पनेतून महाराष्ट्रात 72 ठिकाणी सेवा उपक्रम अंतर्गत प्राथमिक आरोग्य तपासणी व शासकीय विविध योजनांची जनजागृती आदी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. 

या कार्यक्रमात कोल्हापूर येथील आस्था मल्टिपर्पज सोसायटी च्या वतीने व मुकुंदजी शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली कन्या विद्यालय, तळन्दगे, तालुका हातकणंगले, जि. कोल्हापूर येथे प्राथमिक आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते  यामध्ये एकूण 105 विद्यार्थिनींची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली व औषधोपचार  करण्यात आले.

   विद्यार्थिनींची वैद्यकीय तपासणी डॉ. सुरेखा पाटील यांनी केली. आर्या रायन्नावर, मनीषा मगदूम  यांनी त्यासाठी साह्य केले. उपस्थित शिक्षक वर्गाला आरोग्याशी संबंधित विविध शासकीय योजनांची माहिती दिली.डॉ सुरेखा पाटील यांनी मुलींना मासिक पाळीमध्ये शरीरात होणारे बदल  व त्यासंबंधी सविस्तर मार्गदर्शन केले.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आस्था मल्टिपर्पज सोसायटी चे सचिव नरेंद्र पाटील, कन्या विद्यालयाचे मुख्याध्यापक मा. सुतार सर तसेच  भोसले सर, जाधव सर, कुलकर्णी मॅडम, सोनार मॅडम यांची बहुमोल मदत झाली.

Comments