रोटरी क्लब ऑफ करवीर आणि डॉ. शिंदे सुपरस्पेशिलिटी हार्ट क्लिनिक कोल्हापूर यांच्या वतीने "जागतिक हृदय दिनानिमित्त हृदया विषयी परिसंवाद आणि कार्यशाळा"
रोटरी क्लब ऑफ करवीर आणि डॉ. शिंदे सुपरस्पेशिलिटी हार्ट क्लिनिक कोल्हापूर यांच्या वतीने "जागतिक हृदय दिनानिमित्त हृदया विषयी परिसंवाद आणि कार्यशाळा"
कोल्हापूर २८ सिटी न्यूज नेटवर्क
"जागतिक हृदय दिनाचे औचित साधून हृदय रोगाबाबत असणारे समज व गैरसमज याबद्दल लोकांमध्ये जागरुकता निर्माण व्हावी यासाठी रोटरी क्लब ऑफ करवीर आणि डॉ. शिंदे सुपरस्पेशिअलिटी हार्ट क्लिनिक कोल्हापूर यांच्या वतीने हृदया विषयी जाहीर व्याख्यान आणि कार्यशाळा, शनिवार दि. ०१.१०.२०१२ रोजी सकाळी १० वा. शाहू स्मारक भवन, दसरा चौक, कोल्हापूर येथे आयोजित केले आहे. तरी याचा सर्वांनी लाभ घ्यावा. रो. उदय पाटील, रो. दिलीप शेवाळे, रो. स्वप्नील कामत, रो. राजू शिंदे यांनी व्याख्यान आणि कार्यशाळेबाबतची भूमिका विशद केली.
दि. १ ऑक्टोबर २०२२ रोजी सकाळी १० वा. प्रमुख पाहुणे श्री तानाजी दिगंबर सावंत, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, जिल्हा विशेष शाखा, कोल्हापूर यांच्या शुभ हस्ते सदर व्याख्यान आणि कार्यशाळेचे उदघाटन होणार आहे. तसेच प्रमुख उपस्थिती श्री. वसंतराव मुळीक, उपाध्यक्ष, अखिल भारतीय मराठा महासंघ.
तसेच कोल्हापूरचे सुप्रसिदध हृदयरोगतज्ञ व डॉ. शिंदे सुपरस्पेशिअलिटी हार्टक्लिनिक, कोल्हापूरचे डॉ. आलोक शिंदे हे हृदयरोगाबद्दल मार्गदर्शन करतील.
तसेच कोल्हापूर मधील सुप्रसिदध आहारतज्ञ रुफिना कुटिन्हो या "आरोग्यदायी
हृदयासाठी आहार " याबद्दल मोलाचे मार्गदर्शन करतील.
तसेच या कार्यशाळेमध्ये CBC, BSL R. Creat, Lipld Profile, HbA1C अशा रक्ताच्या चाचण्या सवलतीच्या दरामध्ये करण्यात येणार आहेत. त्याच बरोबर ECG Echo या चाचण्या आणि डॉक्टरांचे मार्गदर्शन देखील मिळणार आहे.
Comments
Post a Comment