शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघेंच्या जीवनावर आधारित रांगोळी प्रदर्शनाचे उद्घाटन*

 शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघेंच्या जीवनावर आधारित रांगोळी प्रदर्शनाचे उद्घाटन  


हिंदुत्ववादी आणि देशप्रेमी पिढी निर्माण होण्यासाठी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघेंच्या विचारांनी मार्गक्रमण करण्याची गरज : श्री.राजेश क्षीरसागर

 

कोल्हापूर दि.२७ सिटी न्यूज नेटवर्क

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली धर्मवीर आनंद दिघेंनी आपले संपूर्ण जीवन हिंदुत्व आणि शिवसेनेच्या कार्यास अर्पण केले. धर्मवीर आनंद दिघेंनी सुरु केलेली दहीहंडी, नवरात्रोत्सवाचे लेण अवघ्या महाराष्ट्र राज्यभर पसरले. धर्मवीर आनंद दिघे यांचे कार्य १९९० च्या काळापासून बघितले असून, ठाण्याच्या ढाण्या वाघाच्या आठवणी या रांगोळी प्रदर्शनातून कलाकारांनी जागविल्या आहेत. कलाकारांनी घेतलेली मेहनत कौतुकास्पद असून, आयोजकांचाही उपक्रम अभिनंदन आहे. आगामी काळात शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघेंच्या विचारांची हिंदुत्ववादी आणि देशप्रेमी पिढी निर्माण होण्यासाठी त्यांच्या विचारांनुसार शिवसैनिकांनी आणि युवासैनिकांनी मार्गक्रमण करावे, असे आवाहन राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री.राजेश क्षीरसागर यांनी केले. कोल्हापूर शहरातील खोलखंडोबा तालीम आणि शिवगर्जना तरुण मंडळ यांचे वतीने शारदीय नवरात्रोत्सव २०२२ अंतर्गत शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघेंच्या रांगोळी प्रदर्शनाचे उद्घाटन आज पार पडले. या प्रदर्शनात १२ कलाकारांनी सहभाग घेतला असून, शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघेंच्या जीवनातील अनेक प्रसंग यातून मांडले आहेत.



यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख सुजित चव्हाण, शहरप्रमुख रणजीत जाधव, महानगरप्रमुख शिवाजी जाधव, संयोजक सुनील करंबे, राजेंद्र करंबे, सुनील कालेकर, कपिल नाळे, कल्पेश नाळे, संगीता शिंदे, मनाली कालेकर, अनिता सूर्यवंशी, लक्ष्मी वैद्य, अंजना बल्लाळ, श्रुतिका कोळेकर, आरती पेडणेकर, गीता पाटील, प्रियांका आंबेकर यांच्यासह भागातील नागरिक व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.  


    


Comments