शिवसेना जिल्हा व शहर कार्यकारणीच्या वतीने नूतन पालकमंत्री नाम.मा.श्री. दीपक केसरकर यांचा जाहीर सत्कार

 शिवसेना जिल्हा व शहर कार्यकारणीच्या वतीने नूतन पालकमंत्री नाम.मा.श्री. दीपक केसरकर यांचा जाहीर सत्कार






कोल्हापूर दि.२४ सिटी न्यूज नेटवर्क

शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे साहेब आणि धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या आशीर्वादाने मुख्यमंत्री नाम.मा.श्री.एकनाथ शिंदे यांनी संपूर्ण राज्यात शिवसेनेची बांधणी करण्याचे आदेश दिले असून, कोल्हापूर जिल्हावासियांचे शिवसेनेस नेहमीच पाठबळ लाभले आहे. मुख्यमंत्री नाम.मा.श्री.एकनाथ शिंदे साहेब लोकहिताचे निर्णय घेत असून, त्याचे जनतेतून स्वागत होत आहे. हिंदुहृद्य सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांच्या विचारांचे हिंदुत्ववादी सरकार या राज्यात निर्माण झाले असून, हिंदुत्वाचा नारा बुलंद करण्याकरिता मुख्यमंत्री ना.मा.श्री.एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली हिंदूगर्वगर्जना या जनसंपर्क मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे. आगामी काळात जिल्ह्यातील शिवसेना कार्यकारणीतील उर्वरित नवीन पदे जाहीर करणार आहे. यासह आई अंबाबाईच्या नगरीत आगमन होताच कोल्हापूरचे पालकमंत्री पद जाहीर झाल्याचे भाग्य मानतो. आगामी काळात या सरकारच्या माध्यमातून कोल्हापूर जिल्ह्याचा विकास करू, अशी ग्वाही कोल्हापूर जिल्ह्याचे नूतन पालकमंत्री नाम.मा.श्री.दीपक केसरकर यांनी केले.



कोल्हापूर जिल्ह्याच्या नूतन पालकमंत्री पदी नियुक्तीबद्दल शालेय शिक्षण मंत्री नाम.मा.श्री.दीपक केसरकर यांचा राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री.राजेश क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाने कोल्हापूर जिल्हा व शहर कार्यकारणीच्यावतीने शाल, पुष्पगुच्छ व श्रीफळ देवून जाहीर सत्कार करण्यात आला.

यावेळी जिल्हाप्रमुख सुजित चव्हाण, युवा नेते ऋतुराज क्षीरसागर, मा.परिवहन सभापती राहुल चव्हाण, महानगरप्रमुख शिवाजी जाधव, महानगरसमन्वयक जयवंत हारुगले, शहरप्रमुख रणजीत जाधव, शहर समन्वयक सुनील जाधव, उप-जिल्हाप्रमुख तुकाराम साळोखे, उप-जिल्हाप्रमुख किशोर घाटगे, महिला आघाडी महानगरप्रमुख सौ.मंगलताई साळोखे, महानगरसमन्वयक श्रीमती पूजा भोर, शहर संघटिका सौ.पवित्रा रांगणेकर, तालुकाप्रमुख संजय संकपाळ यांच्याश शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.  



Comments