पॅरा शूटिंग वर्ल्ड चॅम्पियनशिप, 2022 जागतिक अजिंक्यपद स्पर्धेसाठी स्वरुप उन्हाळकर यांना मा.आ.चंद्रकांतदादा पाटील यांनी दिल्या शुभेच्छा
दुबई 2022 येथे होणाऱ्या पॅरा शूटिंग वर्ल्ड चॅम्पियनशिप
या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेसाठी स्वरुप उन्हाळकर यांना मा.आ.चंद्रकांतदादा पाटील यांनी शुभेच्छा दिल्या
कोल्हापूर दि.30 सिटी न्यूज नेटवर्क
दुबई, संयुक्त अरब अमीरात येथे दि. ०३ ते १८ नोव्हेंबर २०२२ दरम्यान पॅरा शूटिंग वर्ल्ड चॅम्पियनशिप, 2022 या जागतिक अजिंक्यपद या स्पर्धेसाठी कोल्हापूरचा पॅरा नेमबाज स्वरुप उन्हाळकर यांची भारतीय संघात निवड झाली आहे. या स्पर्धेमध्ये स्वरूप १० मी एअर रायफल, एअर प्रोन, एअर रायफल मिक्स व ५० मी प्रोन या प्रकारात सहभागी होणार आहेत. या स्पर्धेतून पॅरिस २०२४ या पॅरालिम्पिक स्पर्धेचे तिकीट मिळवण्याची संधी प्राप्त होणार आहे. स्वरूपने राष्ट्रिय व आंतरराष्ट्रीय स्पर्धेत राष्ट्रिय विक्रमासहित अव्वल मानंकान ठेवत या स्पर्धेसाठी पात्रता मिळवली.
नुकतीच बालेवाडी क्रीडा संकुल, पुणे या ठिकाणी उच्चशिक्षण मंत्री मा. आ. चंद्रकांत दादा पाटील यांनी स्वरूपची भेट झाली आसता स्पर्धेचा तयारी संदर्भात माहिती घेतली व या स्पर्धेत यशस्वी होण्यासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी मा.आ.चंद्रकांत दादा पाटील आपले मत व्यक्त करत म्हणाले, 'महाराष्ट्रातील इतर पॅरा खेळाडूंनी स्वरूपचा आदर्श घेऊन मेहनत करावी व ऑलिम्पिक मध्ये भारताचे नाव उंचावावे. त्यासाठी मी व राज्यशासन नेहमी खेळाडूंचा पाठीशी उभे राहील.'
स्वरूप यांना मा. आ. चंद्रकांत दादा पाटील यांचे विशेष सहकार्य मिळाले आहे. यामुळेच स्वरुप आज चांगली कामगिरी करत टोक्यो पॅरालिम्पिक २०२० स्पर्धेपर्यंत मजल मारली.
स्वरूप हा सन २००८ पासून प्रशिक्षक अजित पाटील व युवराज साळोखे यांच्याकडे प्रशिक्षण घेत आहे. त्याचबरोबर बालेवाडी, पुणे येथे गन फॉर ग्लोरी या अकॅडमी अंतर्गत प्रशिक्षक किरण खंदारे व पवन सिंग यांचा मार्गदर्शनाखाली अत्याधुनिक सराव करीत आहे. तो कोल्हापूर डिस्ट्रिक्ट पॅरालिम्पिक असोसिएशन व कोल्हापूर मेन ॲण्ड वूमेन असोसिएशनचा खेळाडू आहे. स्वरूप मा. अनिल पोवार, मा. आर. डी. आरळेकर, मा. शंकरराव कुलकर्णी यांचे मार्गदर्शन मिळत आहे.
Comments
Post a Comment