महाराष्ट्र राज्य खुल्या निवड गुणांकन बुद्धिबळ स्पर्धा
कोल्हापूरच्या आदित्य सावळकरने अग्रमानांकित पुण्याच्या अक्षय बोरगावकरला बरोबरीत रोखले
कोल्हापूर 19 सिटी न्यूज नेटवर्क
राम गणेश गडकरी हॉल पेटाळा, कोल्हापूर येथे कालपासून सुरू झालेल्या महाराष्ट्र राज्य खुल्या निवड गुणांकन बुद्धिबळ स्पर्धेच्या तिसऱ्या फेरीनंतर तृतीय मानांकित औरंगाबादचा इंद्रजीत महिंद्रकर सह श्रेयान मजुमदार मुंबई, मिहीर सरवदे पुणे, कुशाग्र जैन पुणे, ओम गडा मुंबई, ईश्वरी जगदाळे सांगली व रियान शहा मुंबई हे सातजण तीन गुणासह संयुक्तपणे आघाडीवर आहेत. अग्रमानांकित पुण्याचा अक्षय बोरगावकर सह अनिरुद्ध पोतवाड मुंबई,श्रीराज भोसले कोल्हापूर, दिशांक बजाज नागपूर, रचित गुरनानी मुंबई, केवल निर्गुण पुणे, आदित्य सावळकर कोल्हापूर, प्रणव पाटील कोल्हापूर अथर्व मडकर पुणे, प्रदीप आवडे सातारा व योहान बोरीचा मुंबई हे अकराजण अडीच गुणासह संयुक्तपणे द्वितीय स्थानावर आहेत.वीरेश शरणार्थी पुणे,साई बलकवडे रायगड,मानस गायकवाड सोलापूर, आदित्य बारटक्के मुंबई, अनिकेत बापट सातारा,रुपेश भोगल मुंबई, गणेश ताजणे नाशिक,वेदांत नगरकट्टे मुंबई, शर्विल पाटील कोल्हापूर,अनिश गोडसे ठाणे, सोहम मुंबई, सोहम पवार मुंबई, के शशांक मुंबई, ऋषिकेश कबनूरकर कोल्हापूर, निशांत जवळकर पुणे, साई शर्मा नागपूर, स्वरूप जोशी कोल्हापूर,रवी सावंत कल्याण, तृप्ती प्रभू कोल्हापूर, कार्तिक कुंभार कल्याण, जयवीर पाटील मुंबई, शंकर साळुंखे सोलापूर, हदीन महात सांगली, आदित्य चव्हाण सांगली, अन्वय आचरेकर मुंबई, पूर्वन शहा मुंबई, धनंजय यासुगडे परभणी, अभय भोसले कोल्हापूर,आयुष पाटील कोल्हापूर व वरद पाटील कोल्हापूर हे 29 जण दोन गुणासह संयुक्तपणे तृतीय स्थानावर आहेत. आज सकाळची तिसरी फेरी शाहू मॅरेथॉन क्लब बिनखांबी गणेश मंदिर चे अध्यक्ष किसनबापू भोसले व माजी नगरसेवक आणी कोल्हापूर जिल्हा हॉकी असोसिएशनचे अध्यक्ष विजय साळोखे सरदार यांच्या हस्ते सुरू करण्यात आली. तिसऱ्या फेरीत पहिल्या पटावर पुण्याचा अग्रमानांकित अक्षय बोरगावकर विरुद्ध कोल्हापूरचा आदित्य सावळकर यांच्यातील लढत अटीतटीची झाली.आदित्यने तोडीस तोड खेळ्याकरीत अक्षयला 32 व्या चाली नंतर डाव बरोबरीत सोडविण्यास भाग पाडले व सर्वांचे लक्ष वेधून घेतले.दुसऱ्या पटावर तृतीय मानांकित औरंगाबादच्या इंद्रजीत महिंद्रकर विरुद्ध नाशिकच्या गणेश ताजणे यांच्यातील लढत एकतर्फी झाली.इंद्रजीत ने आक्रमक खेळ करत गणेशने अवलंबलेला फ्रेंच बचाव 21 चालीत मोडीत काढत अपेक्षेपेक्षा सहज विजय मिळविला .तिसऱ्या पटावर मुंबईच्या अनिरुद्ध पोतवाड विरुद्ध पुण्याच्या अथर्व मडकर यांच्यातील रॉय लोपेझ प्रकाराने सुरू झालेला सामना 38 चाली नंतर बरोबरी सुटला.कोल्हापूरच्या श्रीराज भोसले ने द्वितीय मानांकित पुण्याच्या अंजनेय पाठक वर लक्षवेदक मात केली.
सांगलीच्या ईश्वरी जगदाळे ने रायगडच्या साई बलकवडे ला पराभवाचा धक्का दिला. सात वर्षाचा कोल्हापूरचा राष्ट्रीय बुद्धिबळपटू वरद पाटील ने मुंबईच्या मानांकित डॉक्टर मेहुल भानुशालींचा धक्कादायक पराभव करताना सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
Comments
Post a Comment