पूर्णा बिजनेस ग्रुप ऑफ कोल्हापूरचा एक अभिनव उपक्रम

 पूर्णा बिजनेस ग्रुप ऑफ कोल्हापूरचा एक अभिनव उपक्रम 



कोल्हापूर ०८  सिटी न्यूज नेटवर्क

 Live n Let Live या सरळ,सहज,साध्या तत्वावर अल्पावधीतच नावारूपाला आलेला Purna Business Group of Kolhapur

बेटी बचाव बेटी पढाव घोषणेपासून प्रेरणा घेत, कोल्हापुरातील एस व्ही ज्वेलर्स च्या वतीने विशेष योजना जाहीर करण्यात आली आहे. एस व्ही ज्वेलर्स मध्ये, लग्नासाठी दागिने खरेदी करणाऱ्या जोडप्यास प्रथम कन्यारत्न प्राप्त झाल्यास 2100 रुपये ची ठेव पावती देण्यात येते. 

आज पर्यंत या योजनेचा 75 हिरकणींनी लाभ घेतला आहे. माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी "बेटी बचाव बेटी पढाव" चा संदेश दिला, स्त्रीभ्रूणहत्या रोखणे व स्त्री जन्माचे स्वागत करणे त्यापासून प्रेरणा घेत न्यू शाहूपुरीतील "एस व्ही ज्वेलर्स" ने लग्नासाठी दागिने खरेदी करणाऱ्या जोडप्यास पहिली मुलगी झाल्यास 2100 रुपये ची ठेव पावती देण्याचा निर्णय घेतला आहे. या योजनेला हिरकणी असे नाव दिले आहे. ही योजना अत्यंत प्रभावीपणे चालू आहे,आज पर्यंत तीनशेहून अधिक जोडप्यांनी या मध्ये नोंदणी केली आहे त्यामध्ये 75 होऊन अधिक जोडप्यांना कन्यारत्न प्राप्त झाले आहे, व त्यांच्या नावे ठेव पावती देण्यात आली आहे. आजपर्यंत यामध्ये या मान्यवरांच्या हस्ते ठेव पावती देण्यात आली आहे.

 मान्यवर शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू देवानंद शिंदे, माननीय इंद्रजीत जी देशमुख, राष्ट्रीय नेमबाज पट्टू राही सरनोबत, मराठा बटालियनचे बाबू नाईक, आयुक्त डॉक्टर मलिकनाथ कलशेट्टी. अशा विविध मान्यवरांच्या हस्ते ठेव पावती आजपर्यंत देण्यात आली आहे व्यवसाय बरोबर सामाजिक उपक्रम राबवल्यामुळे आजपर्यंत समाजामध्ये विविध प्रकारचे पुरस्कार प्राप्त झाले आहेत.

        आजची ठेवपावती "पूर्णा बिजनेस ग्रुप ऑफ कोल्हापूर" च्या हस्ते कुमारी आइजा तनवीर स्वार या हिरकणीला ठेव पावतीचे वितरण करण्यात आले. यावेळी प्रार्थनीय उपस्थिती मंगल नियोगी  व त्यांची सर्व टीम व एस व्ही ज्वेलर्स चे प्रोप्रायटर संतोष कृष्णाजीराव सुर्वे व संपूर्ण स्टाफ उपस्थित होता

Comments