केंद्र सरकार विरोधात 'आप'चा ठिय्या
तपास यंत्रणांची दडपशाही थांबवण्याची मागणी
कोल्हापूर २० सिटी न्यूज नेटवर्क
ईडी-सीबीआय सारख्या केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर करत विरोधी पक्षाच्या नेत्यांना खोट्या आरोपांमध्ये अटक करून केंद्र सरकार दडपशाही करत आहे. दिल्लीचे शिक्षणमंत्री मा. मनीष सिसोदिया यांच्यावर सरकार पाडण्याचा दबाव आणून त्यांची चौकशी सुरू केली गेलेली आहे. तशाच पद्धतीने मा. सत्येंद्र जैन यांना ईडीकडून त्रास दिला जात असल्याचा आरोप आम आदमी पार्टीने केला आहे.
या कारवाईचा निषेध करण्यासाठी आम आदमी पार्टीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर एक दिवसीय ठिय्या आंदोलन करण्यात आले.
हवाला कायद्याचा गैरवापर करून 'आप'च्या मंत्र्यांना अटक करण्यात येत आहे. दिल्लीचे माजी आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन यांच्याविरोधात काहीच पुरावे मिळत नसल्याने त्यांना जामीन मिळू नये म्हणून केंद्र सरकारला कोर्ट बदलण्याची मागणी करण्याची नामुष्की येत आहे. दिल्लीचे शिक्षणमंत्री मनीष सिसोदिया यांच्यावर सीबीआयने धाड टाकून देखील त्यांच्या हाती काहीच लागलेले नाही. आगामी गुजरात निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन केंद्र सरकारकडून दडपशाही सुरू असल्याचा आरोप 'आप'चे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष संदीप देसाई यांनी केला.
याबाबतचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी दत्तात्रय कवीतके यांना देण्यात आले.
यावेळी जिल्हाध्यक्ष निलेश रेडेकर, उत्तम पाटील, अमरजा पाटील, अभिजित कांबळे, भाग्यवंत डाफळे, आदम शेख, संतोष घाटगे, सूरज सुर्वे, मोईन मोकाशी, डॉ. कुमाजी पाटील, विजय दिवाण, आनंदा चौगुले, किशोर खाडे, शशांक लोखंडे, रवींद्र ससे, मयूर भोसले, राज कोरगावकर, राजेश खांडके, राकेश गायकवाड, मंगेश मोहिते, रवींद्र राऊत, दत्तात्रय बोन्गाळे, रवींद्र ससे, अमरसिंह दळवी, दूशंत माने, विलास पंदारे, महेश घोलपे, बसवराज हदीमनी, समीर लतीफ, लाला बिरजे, संजय नलावडे आदी उपस्थित होते.
Comments
Post a Comment