सरसेनापती साखर कारखान्यात उत्पादित पहिल्या सात साखर पोत्यांचे पूजन......
अध्यक्ष नवीद मुश्रीफ यांच्यासह अधिकारी व शेतकऱ्यांच्या उपस्थितीत कार्यक्रम.
बेलेवाडी काळम्मा, . २३: सिटी न्यूज नेटवर्क
सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याचा आठवा गणित हंगाम सुरू झाला. या गळीत हंगामात उत्पादित पहिल्या सात साखर पोत्यांचे पूजन अध्यक्ष नवीद मुश्रीफ यांच्या हस्ते झाले.
श्री. मुश्रीफ पुढे म्हणाले, या हंगामात नऊ लाख टन ऊस गाळपासह सहवीज प्रकल्पातून नऊ कोटी युनिट वीजनिर्मिती करण्याचा संकल्प आहे. इथेनॉल प्रकल्पामधून एक कोटी, २५ लाख लिटर्स निर्यातीचा संकल्प आहे. ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी उत्पादित केलेला सर्वच्या -सर्व उस कारखान्याकडे गाळपासाठी पाठवावा, असे आवाहनही त्यांनी केले.
"२२ तासात साखर उत्पादन......"
कारखान्याने ऊस गाळप सुरू केल्यापासून अवघ्या २२ तासात साखर उत्पादन व्हावयास सुरुवात झाली आहे.
कारखान्याचे जनरल मॅनेजर संजय घाटगे, शेती अधिकारी प्रतापराव मोरबाळे, चीफ इंजिनिअर नामदेव भोसले, चीफ केमिस्ट मिलिंद चव्हाण, डिस्टीलरी मॅनेजर संतोष मोरबाळे, को- जन प्रकल्प मॅनेजर मिलिंद पंडे, इलेक्ट्रिकल मॅनेजर बी. ए. पाटील, इन्स्ट्रुमेंट मॅनेजर भूषण हिरेमठ आदी प्रमुखांसह शेतकरी व कामगार उपस्थित होते.
Comments
Post a Comment