दैनिक राशिभविष्य

 मंगळवार, ४ ऑक्टोबर २०२२. 






अश्विन शुक्ल नवमी, शुभकृतनाम संवत्सर, शरद ऋतू. राशिभविष्य - ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. (संपर्क - 8087520521)


राहुकाळ - दुपारी ३.०० ते दुपारी ४.३० 


चंद्रनक्षत्र:-  'उत्तराषाढा' सकाळी ११.२३ पर्यंत 'अतिगंड' योग.

 

 आज चांगला दिवस, *नावरात्रोथापन व पारणा, आयुध नवमी, महानवमी*


मेष:- अत्यंत यशस्वी दिवस आहे. सौख्य लाभेल. आर्थिक आवक चांगली राहील. कार्यकर्तृत्व सिद्ध होईल.  

     

वृषभ:- ज्याची वाट बघत होतात तो संदेश येईल. दूर देशी शिक्षणास जाल. शुभ घटना घडतील.

 

मिथुन:- आज आरोग्य सांभाळणे आवश्यक आहे. पुरेशी विश्रांती घ्या. मोठी खरेदी होईल.


कर्क:- भौतिक सुखे मिळतील. विवाह इच्छुकांना खुश खबर मिळेल. उत्साह वाढेल.

 

सिंह:- उत्तम आर्थिक लाभ होतील. कर्जे मंजूर होतील. पैशांची व्यवस्था होईल. येणी वसूल होतील.

  

कन्या:- अडचणी दूर होतील. मार्ग सापडतील. प्रेमात यश मिळेल. उत्तम दिवस आहे. 

 

तुळ:- मन प्रसन्न राहील. गृहसौख्य लाभेल. सजावट कराल. पाहुण्यांचे आगमन होईल.

 

वृश्चिक:- आत्यंतिक सुखाचा दिवस आहे. चांगली बातमी समजेल. उत्साह वाढेल. 


धनु:- सामाजिक अन धार्मिक कार्यात सहभागी व्हाल. छंद जोपासले जातील. मन प्रफुल्लित राहील.

 

मकर:- उत्साहवर्धक कालावधी आहे. भविष्याची चिंता दूर होईल. नवीन मार्ग सापडतील. राजकीय स्वप्नाना पंख फुटतील.  

 

कुंभ:- खर्चात टाकणारा दिवस आहे. मात्र चनगल्या कामासाठी खर्च होईल. दानधर्म कराल. धार्मिक कार्यात भाग घ्याल.

 

मीन:- उत्तम आर्थिक लाभाचा दिवस आहे. शिक्षक आणि कॉमर्स क्षेत्रातील लोकांना चांगले लाभ मिळतील. आर्थिक प्रगती होईल.



(कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, 'राशीभाव' या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी -  8087520521.

Comments