पुण्याच्या अक्षय बोरगावकर ची निर्विवाद आघाडी
महाराष्ट्र राज्य खुल्या निवड गुणांकन बुद्धिबळ स्पर्धा
कोल्हापूर २१ सिटी न्यूज नेटवर्क
राम गणेश गडकरी सभागृह येथे बँक ऑफ महाराष्ट्रने पुरस्कृत केलेल्या व चेस असोसिएशन कोल्हापूर च्या वतीने घेण्यात आलेल्या महाराष्ट्र राज्य खुल्या निवड गुणांकन स्पर्धेच्या सातव्या फेरीनंतर अग्रमानांकित पुण्याचा अक्षय बोरगावकर साडेसहा गुणासह निर्विवादपणे आघाडीवर आहे.अनिकेत बापट सातारा चा अनिकेत बापट व नाशिकचा गणेश ताजणे सहा गुणासह संयुक्तपणे द्वितीय स्थानावर आहेत. तृतीय मानांकित औरंगाबादचा इंद्रजीत महिंद्रकर सह केवल निर्गुण पुणे मिहीर सरवदे पुणे व अथर्व मडकर पुणे हे चौघेजण साडेपाच गुणासह संयुक्तपणे तृतीय स्थानावर आहेत. पाचवा मानांकित कोल्हापूरच्या श्रीराज भोसले सह वीरेश शरणार्थी पुणे, मानस गायकवाड सोलापूर,श्रयन मुजुमदार मुंबई, रचित गुरुनानी मुंबई, साई बलकवडे रायगड, आदित्य बारटक्के मुंबई, आदित्य सावळकर कोल्हापूर, रुपेश भोगल मुंबई व कुशाग्र जैन पुणे हे दहा जण पाच गुणांसह संयुक्तपणे चौथ्या स्थानावर आहेत.
आज सकाळी आठ वाजता सावली केअर सेंटर च्या संचालिका सौ.गौरी देशपांडे व युवा उद्योजक त्रिमूर्ती गॅस्केटचे चे अमोल देशपांडे यांच्या हस्ते सातवी फेरी सुरू करण्यात आली.सातव्या फेरीमध्ये पहिल्या पटावर अग्रमानांकित पुण्याचा अक्षय बोरगावकर विरुद्ध पुण्याच्याच केवल निर्गुण यांच्यातील डाव रॉय लोपेझ पद्धतीने सुरू झाला.आक्रमक खेळ करणाऱ्या अक्षय पुढे केवलचा फारसा निभाव लागला नाही 31 चालीनंतर केवल ने शरणागती पत्करली.दुसऱ्या पटावर सातारच्या अनिकेत बापट विरुद्ध पुण्याच्या वीरेश शरणार्थी यांच्यातील डाव वजीर प्याद्याने सुरू झाला.दीर्घकाळात चाललेली ही लढत बरोबरीत सुटेल असे वाटत असताना डावाच्या अंतिम पर्वात विरेशने घोडचूक केली त्याचा अचूक फायदा उठवत अनिकेत ने बहात्तराव्या चालीस विजय मिळविला.तिसऱ्या पटावर नाशिकच्या गणेश ताजणे ने मुंबईच्या रचित गुरनानी विरुद्ध सेंटर काउंटर प्रकाराने सुरू झालेल्या डावात अवघ्या 28 चालीत रचितचा फडशा पाडला.चौथ्या पटावर तृतीय मानांकित औरंगाबादच्या इंद्रजीत महेंद्रकर विरुद्ध कोल्हापूरच्या प्रणव पाटील यांच्यातील लढत फिलिडॉर डिफेन्स प्रकाराने सुरू झाली.अनुभवाच्या जोरावर इंद्रजीत ने प्रणवचा 53 व्या चालीस पराभव केला.पाचव्या पटावर कोल्हापूरचा शर्विल पाटील पुण्याच्या मिहीर सरवदे कडून 41 चालीत पराभूत झाला.कोल्हापूरच्या महिमा शिर्केने ठाण्याच्या मानांकित अनिश गोडसेला बरोबरीत रोखले.पुसदच्या आकाश पुंडे ने सांगलीच्या मानांकित आदित्य चव्हाण ला पराभूत करताना सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
तत्पूर्वीची सहावी फेरी तिचा जागर न्यूज चॅनलच्या शर्वरी पवार आणि महाराष्ट्र जीएसटीचेे सहाय्यक कमिशनर व राष्ट्रीय बुद्धिबळपटू जयांकुर चौगले यांच्या हस्ते सुरू करण्यात आली. सहाव्या फेरीत पहिल्या पटावर अग्रमानांकित पुण्याचा अक्षय बोरगावकर विरुद्ध पुण्याच्याच मिहीर सरवदे यांच्यातील दीर्घकाल झालेल्या लढतीत अक्षय ने मिहीरचा पराभव केला.दुसऱ्या पटावर तृतीय मानांकित औरंगाबादच्या इंद्रजीत महेंद्रकरला पुण्याच्या केवल निर्गुणने पराभव चा धक्का दिला.तिसऱ्या पटावर पुण्याच्या वीरेश शरणार्थीने कोल्हापूरच्या आदित्य सावळकर ला नमविले तर नाशिकच्या गणेश ताजनेने मुंबईच्या श्रेयान मुजुमदार वर नेत्रदीपक विजय मिळविला.कोल्हापूरच्या शर्विल पाटीलने मुंबईच्या मानांकित वेदांत नगरकट्टे ला पराभूत केले.कोल्हापूरच्या वेदांत दिवाण ने कोल्हापूरच्याच मानांकित वरद पाटीलला पराभवाचा धक्का दिला.सातारची अंध बुद्धिबळपटू संस्कृती मोरेने मानांकित सांगलीच्या इशान कुलकर्णीवर मात केली तर रत्नागिरीच्या निधी मुळ्ये ने कोल्हापूरच्या जेष्ठ व मानांकित आनंदराव कुलकर्णी ना बरोबरीत रोखले.
Comments
Post a Comment