उमेद ने केली वंचितांची दिवाळी गोड
कोल्हापूर २५ सिटी न्यूज नेटवर्क
"उमेद फौंडेशन" या सामाजिक संस्थेमार्फत सामाजिक बांधिलकीतून कोल्हापूर व सिंधुदुर्ग जिल्ह्यात झोपड्या आणि पालात माळावर राहणाऱ्या ५०० वंचित कुटुंबांना दिवाळी फराळ वाटप करून "वंचितांच्या दारी दिवाळी" साजरी करण्यात आली.सलग सातव्या वर्षी हा उपक्रम राबवण्यात आला.
सांगरूळ फाटा, कोपार्डे येथील माळावर कचरा वेचक,हेळवी, ओतकाम करणारे, शेतात हंगामी काम करणारे मजूर अशी अनेक स्थलांतरित कुटुंबे राहण्यासाठी येतात.दिवाळी सणावेळी या कुटुंबांना उमेद फौंडेशनमार्फत प्रत्येक वर्षी फराळ वाटप करण्यात येते. यावर्षीही हा उपक्रम राबवण्यात आला.कार्यकर्त्यांनी प्रत्येक झोपडी व पालात जाऊन रांगोळी काढली व आकाशदिवे लावण्यात आले. तसेच त्यांच्या झोपड्यांसमोर पणत्या पेटवण्यात आल्या. प्रत्येक कुटुंबाला दिवाळी फराळासह तेल,साबण,उटणे आणि कपडे वाटप करण्यात आले. यावेळी पालातील गरिबांच्या चेहऱ्यावर आनंदाचे भाव उमटले.असुर्ले- पोर्ले येथील ऊस तोडणी कामगार, सांगरूळ येथील गरीब कुटुंबीय, तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गरीब कुटुंबांना आणि असलदे वृद्धाश्रम (कणकवली),जीवदान विशेष शाळा व संविता आश्रम (कुडाळ) या आश्रमांना उमेदतर्फे दिवाळी फराळाचे साहित्य वाटप करण्यात आले.सलग सातव्या वर्षी हा उपक्रम राबवण्यात आला.
यावेळी प्रकाश गाताडे,प्रा.एस.पी.चौगले,विनायक पाटील,दिगंबर पाटील, प्रदीप नाळे ,नवीनचंद्र सनगर, प्रकाश म्हेत्तर, विक्रम म्हाळुंगेकर,सचिन बगाडे, एकनाथ पाटील,सागर कासोटे, पुनम पाटील -कवडे ,नामदेव कवडे, इंद्रजीत खाडे,किशोर भोसले, अभय पाटील,भिमराव चाबूक, दिलीप पाटील,बाजीराव तळेकर, सर्जेराव खाडे , अक्षय पाटील , अजय पाटील, विजय पाटील हे उपस्थित होते.
Comments
Post a Comment