दैनिक राशिभविष्य

 मंगळवार, १८ ऑक्टो२०२२




 - ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. (संपर्क - 8087520521)


राहुकाळ - दुपारी ३.०० ते दुपारी ४.३०


"आज चांगला दिवस आहे. " 


चंद्र नक्षत्र - पुष्य (अहोरात्र)


टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या "राशीभाव" या  फेसबुक पेजला भेट द्या.


मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ)  गुरू चंद्र शुभ योग कामाला गती देईल. वास्तू संबंधित निर्णय होतील. मातेकडून लाभ होतील.  

     

वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो)  सुखाचा दिवस आहे. आर्थिक प्रगती उत्तम होईल. मन आनंदी राहील.

 

मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) कौटुंबिक सुख लाभेल. कलाकारांना यश मिळेल. आनंदी राहाल.


कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) मेजवानी मिळेल. आर्थिक अवाक वाढेल. प्रसन्न वाटेल.

 

सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) खर्चात वाढ होईल. मात्र काळजीचे कारण नाही. ध्यानधारणा करा.

  

कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) उत्तम दिवस आहे. संधीचे सोने करा. नवीन कल्पना साकार होतील.  

 

तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) कामानिमित्त नवीन ओळखी होतील. वरिष्ठांची मर्जी सांभाळा. नवीन जोडधंदा सुरू कराल.

 

वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु)  सुचक घटना घडतील. नात्यातून लाभ होतील. दूरच्या नात्यात संवाद साधाल.


धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) प्रतिकूल दिवस आहे. पीडादायक अनुभव येऊ शकतात. आरोग्य संभाळा. कर्जे नकोत.

 

मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) विवाह इच्छुकांना शुभ कालावधी आहे. प्रेमात यश मिळेल. जोडीदार खुश राहील.


कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) लाभाचा दिवस आहे.  धाडसी निर्णय घ्याल. श्री हनुमान उपासना करा. 

 

मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) अपत्यांशी संवाद साधा. सावध पवित्र घ्या. प्रगतीचा वेग मर्यादित ठेवा.


(कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, 'राशीभाव' या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. "राशीभाव" या फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी -  8087520521)

Comments