बी टेन्यूअर संदर्भातील शिवसेनेच्या शिबिरास यश, २६ प्रकरणे निकाली

 बी टेन्यूअर संदर्भातील शिवसेनेच्या शिबिरास यश, २६ प्रकरणे निकाली


"शासन आपल्या दारी" उपक्रमाच्या माध्यमातून शहरातील बी टेन्यूअर, इनामी जमिनी, झोपडपट्टी कार्डांचे प्रश्न मार्गी लावणार : श्री.राजेश क्षीरसागर*

 




*"बी" टेन्यूअर नोंदी कमी करण्याचे आदेशाचे श्री.राजेश क्षीरसागर यांच्या हस्ते नागरिकांना वितरण*


कोल्हापूर दि.१८ सिटी न्यूज नेटवर्क

कोल्हापूर महानगरपालिका हद्दीतील अनेक भागात "बी" टेन्यूअर नोंदीची प्रकरणात अनेक नागरिक अडकलेले असून, हा मोठा गंभीर प्रश्न गेले अनेक वर्षे शहरवासियांना भेडसावत आहे. या नागरिकांना यातून दिलासा मिळावा, त्यांच्या हक्काच्या मालमत्तेचा वापर, लाभ त्यांना घेता यावा यासाठी शुक्रवार पेठ, उत्तरेश्वर पेठ, जुना बुधवार पेठ परिसरातील नागरिकांसाठी शिवसेनेच्या वतीने आयोजित ''बी" टेन्यूअर नोंदीच्या दुरुस्तीचे शिबीर हे प्राथमिक स्वरूपात आयोजित करण्यात होते. यास यश प्राप्त झाले असून, २९ पैकी २६ नागरिकांच्या मालमत्तांवरील बी ट्येन्यूअर च्या नोंदी कमी करण्यात आल्या आहेत. आगामी काळात शासन आपल्या दारी या माध्यमातून यास व्यापक स्वरूप देवून शहरातील विविध भागात अशा शिबिरांचे आयोजन करून शहरातील बी टेन्यूअर, इनामी जमिनी, झोपडपट्टी कार्डांचे प्रश्न लवकरच मार्गी लावू, अशी ग्वाही राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री.राजेश क्षीरसागर यांनी दिली. 

शिवसेनेच्या वतीने ''बी" टेन्यूअर नोंदीच्या दुरुस्तीचे शिबीर माहे जून २०२२ मध्ये पार पडले. या शिबिरातील मस्कुती तलाव परिसरातील नागरिकांच्या मालमत्ता पत्रकावरील "बी" टेन्यूअर नोंदी कमी करण्याचे आदेश सक्षम प्राधिकाऱ्याकडून निर्गमित करण्यात आले आहेत. मा.श्री.राजेश क्षीरसागर साहेब, कार्यकारी अध्यक्ष, राज्य नियोजन मंडळ, महाराष्ट्र राज्य (कॅबिनेट मंत्री दर्जा) यांच्या हस्ते "बी" टेन्यूअर नोंदी कमी केल्याच्या आदेशाच्या प्रती नागरिकांना "श्री उत्तरेश्वर प्रासादिक वाघाची तालीम हॉल, उत्तरेश्वर पेठ, कोल्हापूर" येथे वितरीत केल्या गेल्या.

यावेळी बोलताना नगरभूमापन अधिकारी श्री.किरण माने यांनी, बी टेन्यूअर प्रकरणासंदर्भात सविस्तर माहिती दिली. नागरिकांची होणारी धावपळ थांबविण्यासाठी आवश्यक कागदपत्रे तात्काळ उपलब्ध करून दिली गेली. याकामी राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री.राजेश क्षीरसागर यांनी वेळोवेळी पाठपुरावा, मार्गदर्शन व सहकार्य केल्याने या शिबिराच्या माध्यमातून नागरिकांना न्याय देवू शकल्याची भावना व्यक्त केली.

यावेळी बोलताना राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री.राजेश क्षीरसागर पुढे म्हणाले कि, शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण या विचारांची आपली कार्यपद्धती आहे. निवडणुकीपुरते काम करणारे अनेक आहेत. निवडून यायचं आणि ५ वर्षे लोकांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करायचे, अशाने जनतेचे प्रश्न जैसे थे च राहतात, ही कार्यपद्धती आपली नाही. निस्वार्थीपणे जनहिताचे काम फक्त शिवसेनाच करू शकते हे या माध्यमातून दाखवून दिल्याचे समाधान आहे. गेले ४० वर्षे प्रलंबित असलेला प्रश्न प्राथमिक प्रमाणात मार्गी लागल्याने नागरिकांतून समाधान व्यक्त होत आहे. शहरातील बी टेन्यूअर, इनामी जमिनी, झोपडपट्टी कार्ड अशा प्रकारच्या अडचणीमध्ये असलेल्या नागरिकांनी शनिवार पेठ येथील शिवसेना जिल्हा मध्यवर्ती कार्यालयाशी संपर्क साधावा. जून महिन्यात पार पडलेल्या शिबिरातील ९० टक्के प्रकरणे निकाली काढल्याबद्दल प्रशासकीय अधिकारी यांचेही अभिनंदन. या प्राथमिक शिबिराच्या अनुभवाच्या जोरावर शहरात इतर ठिकाणी शासन आपल्या दारी या उपक्रमास व्यापक स्वरूप प्राप्त करून देत आगामी काळात शहरातील विविध भागात अशा शिबिरांचे आयोजन करून शहरातील बी टेन्यूअर, इनामी जमिनी, झोपडपट्टी कार्डांचे प्रश्न लवकरच मार्गी लावू, अशी ग्वाही दिली.

यावेळी माजी स्थायी समिती सभापती नंदकुमार मोरे, उपजिल्हाप्रमुख किशोर घाटगे यांनी मनोगते व्यक्त केली. तर आभार प्रदर्शन शिव अल्पसंख्याक सेनेचे संपर्कप्रमुख रियाज बागवान यांनी केले. यानंतर भागातील नागरिकांच्यावतीने राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री.राजेश क्षीरसागर यांचा फेटा, शाल, श्रीफळ व पुष्प्गुच्छ देवून विशेष सत्कार करण्यात आला.

या शिबिरास युवा नेते ऋतुराज क्षीरसागर, नगर भूमापन कार्यालयाचे कुमार यादव, करवीर मंडल अधिकारी संतोष पाटील, करवीर मुख्य तलाठी अमित पाडळकर, शिवसेनेचे निलेश हंकारे, अशोक पाटील, शिवसेना उपशहरप्रमुख अरुण सावंत, सनी अतिग्रे, कपिल नाळे, किशोर माने, राकेश पोवार, फेरीवाले सेना शहरप्रमुख अर्जुन आंबी, विभागप्रमुख सुरज धनवडे, अनंत पाटील, अक्षय बोडके, विनोद हजारे, विनायक जाधव, शिवतेज सावंत, आदी उपस्थित होते.    



Comments