दैनिक राशिभविष्य

 शुक्रवार, १४ ऑक्टोबर २०२२, 






अश्विन कृष्ण पंचमी. शरद ऋतू.  राशिभविष्य - ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. (संपर्क - 8087520521)


राहू काळ - सकाळी १०.३० ते दुपारी १२.०० 


आज दुपारी २.०० नंतर चांगला दिवस आहे.


चंद्र नक्षत्र - रोहिणी  


मेष:- नोकरी व्यवसाय संबंधित ठोस निर्णय होईल. शब्दास मान मिळेल. दीर्घकालीन फायद्याचे करार होतील. 

     

वृषभ:- गूढ उलगडले जाईल. सूचक घटना घडतील. आनंदात कालावधी व्यतीत होईल. 

 

मिथुन:- खर्चात वाढ झाली तरीही मौल्यवान खरेदी होणार आहे. मन आनंदी राहील. 


कर्क:- आर्थिक आवक उत्तम राहील. संधीचे सोने करा. कामे मार्गी लागतील. उत्साह वाढेल. 

 

सिंह:- सौख्य लाभेल. उत्साही वाटेल. सहकारी मदत करतील. शत्रू पराभूत होतील.  

  

कन्या:- सूचक घटना घडतील. अचानक धनलाभ  होईल. जेष्ठ व्यक्तीचा सल्ला मोलाचा ठरेल.    

 

तुळ:-  आरोग्याची काळजी घ्या. छंद जोपासा. वास्तू संबंधित कामे मार्गी लागतील. पत्नीकडून लाभ होतील.  

 

वृश्चिक:- शुभ समाचार समजतील. प्रेमात यश मिळेल. कुटुंबास वेळ द्याल.


धनु:- आर्थिक आवक चांगली राहील. मान सन्मान मिळतील. वेळ दवडू नका. आनंदी वाटेल.   

 

मकर:- शिक्षणासाठी दूर जाण्याचे बेत आखाल. स्पर्धेत अधिक मेहनत करावी लागेल मात्र शुभ समाचार समजतील. प्रगती होईल. 

 

कुंभ:- वास्तू संबंधित कामे मार्गी लागतील. योग्य कामी खर्च होईल. भौतिक सुखे मिळतील. नवीन संधी चालून येतील.   

 

मीन:- उत्तम दिवस आहे. आर्थिक लाभ होतील. लेखन घडेल. सन्मान मिळतील. 


(कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, 'राशीभाव' या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी -  8087520521)

Comments