जिनेंद्र सांगावे करणार आंतरराष्ट्रीय रेस मध्ये भारताचे प्रतिनिधित्व- कोल्हापूर च्या क्रीडा विश्वाची गौरवास्पद भरारी..
जिनेंद्र सांगावे करणार आंतरराष्ट्रीय रेस मध्ये भारताचे प्रतिनिधित्व- कोल्हापूर च्या क्रीडा विश्वाची गौरवास्पद भरारी
कोल्हापूर २२ सिटी न्यूज नेटवर्क
आंतरराष्ट्रीय रेसर जिनेंद्र सांगावे याची वेलेंसिया स्पेन ( Valencia, Spain) येथे होणार्या एफ आय एम मिनी जिपी वर्ल्ड सिरीज (FIM MINIGP WORLD SERIES) साठी निवड करण्यात आली आहे. जिनेंद्र सोळा देशांमधील स्पर्धकांबरोबर रेस मध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे. त्यामुळे कोल्हापूरच्या या छोट्या रेसरला आंतर्राष्ट्रीय ट्रॅक रेसिंग मध्ये भारताचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली आहे. कोल्हापूरच्या सह भारताच्या रेसिंग इतिहासात ही एक अत्यंत महत्वपूर्ण आणि अभिमानाची ही घटना आहे.
मानवी कौशल्य आणि अति आधुनिक तांत्रिकता यांचा अंत्यत कुशलतेने व सातत्यपुर्ण सरावाने जिनेंद्र वयाच्या सातव्या वर्षापासून रेसिंग क्षेत्रात सक्रिय असून नॅशनल सुपरक्राॅस चॅम्पियनशिप, नॅशनल रोड रेसिंग चॅम्पियनशिप, टिव्हिएस वन मेक चॅम्पियनशिप (TVS One Make) या आणि ईतर विविध राष्ट्रीय स्पर्धांमध्ये सातत्याने उत्तम यश मिळवत आहे.
डोरना स्पोर्ट्स (Dorna Sports) ने मोटो जीपी या टू व्हीलर रेसिंग स्पर्धेची पहिली पायरी म्हणुन कमी वयोगटातील रेसर साठी मिनी जीपी सिरीज मागील वर्षापासून चालू केली. त्यासाठी वेगवेगळ्या देशात त्यांनी चाचणी फेर्या आयोजित केल्या होत्या. भारतातील चाचणी फेरी बेंगलूर येथे आयोजित करण्यात आली होती. त्यात झालेल्या दहा रेस पैकी जिनेंद्रने सहा रेस जिंकल्या आणि स्पर्धेमध्ये निर्विवादपणे आपली पात्रता सिद्ध केली आहे.
जिनेंद्रच्या या यशामध्ये नेहमीच मदत करत असलेलल्या टिव्हीएस रेसिंग टीम , एक्सोर हेल्मेट कंपनी, मोहीतेज रेसिंग अकॅडमी, आवाडे मोटर स्पोर्टस, अरूअनी ग्रिड, रेस डायनॅमिक्स, रॉयल राइडर्स कोल्हापूर यांचे सहकार्य आणि प्रोत्साहन लाभत आहे. या आतरराष्टीय मोहीमेसाठी जिनेंद्रला मोहितेज रेसिंग अकॅडेमीचे अभिषेक मोहीते आणि ध्रुव मोहिते, एक्सोर हेल्मेटचे सेल्स मॅनेजर विशाल गीते, पीटर सप्परपू सह टिव्हीएस रेसिंग तर्फे गायत्री पटेल यांच्या ऊपस्थितीत विविध मान्यवरानी शुभेच्छा दिल्या आहेत.
Comments
Post a Comment