आज षष्ठीच्या तिथीला करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी अर्थात आई अंबाबाई भुक्ती मुक्ती प्रदायिनी या रूपात

 आज षष्ठीच्या तिथीला करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी अर्थात आई अंबाबाई भुक्ती मुक्ती प्रदायिनी या रूपात




कोल्हापूर ०१  सिटी न्यूज नेटवर्क

 शारदीय नवरात्र महोत्सवाचा आजचा सहावा दिवस. आज षष्ठीच्या तिथीला करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी अर्थात आई अंबाबाई भुक्ती मुक्ती प्रदायिनी या रूपात सजली आहे अगस्ती ऋषींनी रचलेल्या अष्टकात भुक्ती मुक्ती प्रदे देवी असा उल्लेख केलेला आहे. या भारत भूमीमध्ये अनेक तीर्थ आहेत कित्येक तीर्थ भुक्ती म्हणजे आयुष्याची सर्व सुखं देतात, भोग देतात तर काही तीर्थ ही मुक्ती देतात पण करवीर हे एकमात्र असे तीर्थ आहे जी भुक्ती आणि मुक्ती दोन्ही देतं. भुक्ती अर्थात जगण्याची सर्व सुखं आणि मुक्ती अर्थात पुन्हा जन्म मरणाचा फेरा न पाहण्याचं शाश्वत वरदान. करवीर क्षेत्री या दोन्ही गोष्टींची प्राप्ती होते कारण हे क्षेत्र या मोठ्या आईचं अर्थात महामातृकक्षेत्र म्हणून ओळखलं जातं.याच रूपात साकारलेली करवीर निवासिनीची आजची पूजा. चतुर्भुजा आदिशक्ती पुढे भक्ती अर्थात राज्यप्राप्तीच्या अभिलाषा देवीची सेवा करणारा सुरथ राजा आणि मुक्तीच्या अपेक्षेने देवीची उपासना करणारा समाधी वैश्य या रूपात असलेली ही पूजा गजानन मुनीश्वर श्रीनिवास जोशी यांनी साकारली आहे. विशेष आभार पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समिती

 श्रीमातृचरणारविंदस्य दास प्रसन्न सशक्तीकः

Comments