रोट्रेक्ट क्लब ऑफ करवीर व्हिजन च्या वतीने सन्मान नवदुर्गांचा कार्यक्रम संपन्न.

 रोट्रेक्ट क्लब ऑफ करवीर व्हिजन च्या वतीने सन्मान नवदुर्गांचा कार्यक्रम संपन्न.




समाजातील विविध क्षेत्रात कार्यरत महिलांचा नवरात्री उत्सवानिमित्त केला सन्मान.


कोल्हापूर ०४ सिटी न्यूज नेटवर्क

रोट्रेक्ट क्लब ऑफ करवीर व्हिजन कोल्हापूर यांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी शारदीय नवरात्री उत्सवाचे औचित्य साधून सन्मान नवदुर्गांचा हा उपक्रम घेण्यात आला.

या उपक्रमाद्वारे समाजातील विविध क्षेत्रात कार्यरत महिलांचा सन्मान करण्यात आला.


कार्यक्रमाच्या सुरवातीला राष्ट्रपिता महात्मा गांधी, माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमा पुजन करण्यात आले. त्यांनंतर बोलताना कोल्हापूर झोनचे झेड. आर. आर सौरभ कुलकर्णी यांनी

कार्यक्रमाचा उद्देश स्पष्ट केला.


त्यानंतर वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत असणा-या डॉ. सीमा तेंडुलकर,

शिक्षण क्षेत्रात कार्यरत असणा-या सौ. लेखा सुजित मिणचेकर, कोव्हीड काळात आयुर्वेदिक औषधाच्या माध्यमातून अनेक रुग्णाना जीवदान देणा-या डॉ. चंद्रमुखी गरड,अनेक मुक्या प्राण्याना आसरा देणा-या सौ. श्रद्धा सूर्यवंशी यांना सन्मानपत्र तसेच पंजाब येथील सोहन स्वीटस यांच्याकडून खास आलेल्या मिठाईचे बॉक्स तसेच मानाचा फेटा बांधुन रोटरी क्लब ऑफ करवीरचे अध्यक्ष रोटेरियन उदय पाटील सर यांच्या हस्ते सन्मानीत करण्यात आले.


त्यानंतर बोलताना रो.उदय पाटील यांनी, क्लबच्या उपक्रमाचे कौतुक करून सर्व सत्कारमूर्ती महिलांचे अभिनंदन केले.

यांनंतर इचलकरंजी येथील ए. जे. सोशल वेलफेअर असो.च्या अबोली जिगजीनी, सांगली येथील संघिनी ग्रुपच्या माध्यमातून हजारो महिलांच संघटन करून अनेक उपक्रम राबविणा-या सौ. प्रियांका कर्लेकर-कुलकर्णी, कोल्हापूर आर.टी.ओ येथील सहा.आर. टी. ओ सौ. शितल जाधव-कोळी, सुरभी फौंडेशनच्या माध्यमातून अनेक उपक्रम राबविणा-या तसेच तृतीयपंथी वर्गाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी कार्यरत असणा-या श्रीमती सुरेखा भिंगले यांचा सन्मानपत्र, मानाचा फेटा तसेच मिठाई बॉक्स देऊन सन्मान करण्यात आला.


यावेळी अजिंक्य युवाशक्तीचे अजिंक्य अशोक जाधव, क्लबचे संस्थापक सचिव आणि माजी अध्यक्ष, उद्योजक राज  कोरगावकर तसेच सर्वच सत्कारमूर्ती महिलांनी आपल्या मनोगता मध्ये क्लब च्या या उपक्रमाचे कौतुक करून या सन्मानामुळे पुन्हा जोशात काम करण्याची ऊर्जा प्राप्त झाल्याची भावना व्यक्त केली.

या कार्यक्रमाला रोट्रॅक्ट क्लब ऑफ करवीर व्हिजन कोल्हापूरचे सर्व सदस्य तसेच कोल्हापूरातील विविध क्षेत्रातील मान्यवर, नागरिक उपस्थित होते.

Comments