कोल्हापूर जिल्हा निवड बुद्धिबळ स्पर्धेत रेंदाळचा श्रीराज भोसले विजेता तर कागल चा निहाल मुल्ला उपविजेता; आदित्य सावळकर तृतीय
कोल्हापूर 16 सिटी न्यूज नेटवर्क
छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम मधील बुद्धिबळ संघटनेच्या हॉलमध्ये चेस असोसिएशन कोल्हापूरने आयोजित केलेल्या कोल्हापूर जिल्हा खुल्या निवड बुद्धिबळ स्पर्धेत रेंदाळचा श्रीराज भोसले ने सात पैकी सहा गुण करून सरस टायब्रेक गुणावर अजिंक्यपद पटकावले तर कागलच्या निहाल मुल्ला ला सहा गुणा मिळवूनही कमी टायब्रेक गुणामुळे उपविजेतेपदवर समाधान मानावे लागले. कोल्हापूरचा आदित्य सावळकर व वरद आठल्ये यांचा अनुक्रमे तिसरा व चौथा क्रमांक आला. या चौघांची निवड कोल्हापूर येथे ऑक्टोबर 18 ते 21 ऑक्टोबर दरम्यान होणाऱ्या महाराष्ट्र राज्य निवड बुद्धिबळ स्पर्धेसाठी कोल्हापूर जिल्हा संघात झाली आहे.
या स्पर्धेचा बक्षीस समारंभ कोल्हापूर जिल्हा बुद्धिबळ संघटनेचे अध्यक्ष प्राध्यापक अरुण मराठे सर यांच्या शुभहस्ते करण्यात आला यावेळी व्यासपीठावर आंतरराष्ट्रीय पंच भारत चौगुले, सूर्याजी भोसले, मनीष मारुलकर,धीरज वैद्य, उत्कर्ष लोमटे आरती मोदी उपस्थित होते.
विविध वयोगटातील उत्तेजनार्थ बक्षीसे पुढील प्रमाणे
*पंधरा वर्षाखालील उत्कृष्ट बुद्धिबळपटू* शंतनु पाटील, महिमा शिर्के व ऋषिकेश कबनूरकर
*अकरा वर्षाखालील उत्कृष्ट बुद्धिबळपटू* अभय भोसले, अरिना मोदी व तरुण गिरमल
*नऊ वर्षाखालील उत्कृष्ट बुद्धिबळ पटू* शौर्य बागडिया,वेदांत बांगड व सिद्धी कर्वे
*सात वर्षाखालील उत्कृष्ट बुद्धिबळपटू* श्रेयस कुडाळे, शर्विल पेटकर व अर्णव जोशी


Comments
Post a Comment