रविवारी कोल्हापूर जिल्हा खुल्या निवड बुद्धिबळ स्पर्धा कोल्हापूरात
कोल्हापूर 15 सिटी न्यूज नेटवर्क
कोल्हापूर जिल्हा बुद्धिबळ संघटनेच्या मान्यतेने व चेस असोसिएशन कोल्हापूर च्या वतीने रविवार दिनांक 16 ऑक्टोबर रोजी कोल्हापूर जिल्हा खुल्या निवड बुद्धिबळ स्पर्धा घेण्यात येणार आहेत.
छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम येथे या स्पर्धा स्विस लीग पद्धतीने आंतरराष्ट्रीय जलद बुद्धिबळाच्या नियमानुसार होणार आहेत.रविवारी सकाळी साडेनऊ वाजता या स्पर्धेचे उद्घाटन झाल्यावर स्पर्धेच्या पहिल्या फेरीस प्रारंभ होईल. या स्पर्धेमध्ये फक्त कोल्हापूर जिल्ह्यातील बुध्दिबळपटूना भाग घेता येईल.
या निवड स्पर्धेतून पहिल्या चार बुद्धिबळपटूंची निवड कोल्हापूर येथे 18 ते 21 ऑक्टोंबर दरम्यान होणाऱ्या महाराष्ट्र राज्य खुल्या निवड बुद्धिबळ स्पर्धेसाठी करण्यात येणार आहे़.
स्पर्धा विजेत्या पहील्या सहा खेळाडूंना अनुक्रमे 1) रु 1000/- 2) रु.750/- 3) रु.500/- 4) रु.350/- 5)रु.200/- 6)रु.200/- अशी बक्षीसे दिली जाणार आहे. या व्यतिरिक्त उत्तेजनार्थ बक्षीस म्हणून 7, 9,11 व 15 वर्षाखालील गटात प्रत्येकी तीन मेडल्स दिली जाणार आहेत.
निवड झालेल्या बुद्धिबळपटूंना राज्य निवड बुद्धिबळ स्पर्धा खेळून झाल्यावर प्रत्येकी एक हजार रुपये संघटनेच्या वतीने देण्यात येणार आहे.
या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी रुपये 200 प्रवेश शुल्क ठेवले आहे. तरी इच्छुक बुद्धिबळपटू नी आपली नावे शनिवार दिनांक 15 ऑक्टोबर रात्री आठ वाजेपर्यंत प्रवेश फी सह आपली नावे खालील व्यक्तीकडे नोंदवावीत.
1) श्री. भरत चौगुले (कोल्हापूर) 7620067251.
2) मनीष मारुलकर (चीफ ऑर्बिटर )- +919922965173
3) उत्कर्ष लोमटे - 9923058149
4) प्रितम घोडके - 8208650388
5) रोहित पोळ - 9657333926
.jpeg)
Comments
Post a Comment