WCRM सिल्वासामध्ये Royal Ryders कोल्हापूर क्लबचा पून्हा एकदा दबदबा
कोल्हापूर 12 सिटी न्यूज नेटवर्क
WCRM (वेस्ट कोस्ट रायडर्स मिट ) च्या वतीने दरवर्षी मानाचा "रायडर मिट" हा उपक्रम घेतला जातो. या Event मध्ये भारताच्या विविध राज्यांतील आणि परदेशातील बुलेट क्लब सहभागी होतात. फक्त निमंत्रित आणि निवडक क्लब ना येथे सहभागी केले जाते. गेली २ वर्षे सलग रॉयल राइडर्सचे सदस्य या इवेंट मध्ये सहभागी होतात. आणि प्रत्येक वर्षी स्पर्धेत चांगले यश मिळवितात. या वर्षी हा सोहळा सिल्वासा, दिव दमन येथे आयोजित केला गेला होता या मध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या रेस चे आयोजन केले जाते.
देशभरातुन निवडक सुमारे ६०० बुलेट स्वार वेगवेगळ्या राज्यातून या उपक्रमासाठी येतात आणि रेसिंग मध्ये आपले कौशल्य आजमावत असतात.अश्याच प्रकारे कोल्हापूर च्या रॉयल रायडर्स या बुलेट ग्रुपने 3 प्रकारामध्ये बक्षीस पटकावून कोल्हापूरचे नाव देशपातळीवर उज्ज्वल करून रेसिंग मध्ये कोल्हापूरचा दबदबा कायम राखला आहे. यातील अत्यंत कठिन अशा '' '' 'टाइम ट्रायल ' या स्पर्धेत
रॉयल राइडर्स च्या रायडर नी जबरदस्त यश मिळवले. संततधार पाऊस झालेमुळे खुप चिखल झाल्याने या स्पर्धेचा ट्रॅक खुप अवघड झाला होता. भले भले रायडर्स ही स्पर्धा पुर्ण करताना दमत होते. रॉयल रायडर्स नी आपले पुर्ण कौशल्य पणाला लावून ही स्पर्धा यशस्वी रित्या पुर्ण केली. स्पर्धेचा निकाल खालील प्रमाणे.
६५० CC क्लास मध्ये रायडर यश सबनीस यांनी पहिला क्रमांक पटकाविला
.
500cc क्लास मध्ये क्लबचे अनुभवी रायडर महेश चौगुले यांनी 2 रा क्रमांक
.
हिमालयन ४१०cc क्लास मध्ये रायडर पार्थ अथने यांनी २ रा क्रमांक पटकावला.
.
३५० cc क्लास मध्ये रायडर आकाश बडे यांनी ४ था क्रमांक पटकावला.
.
कल्बचे रायडर्स या इव्हेंट मधिल बाकीच्या स्पर्धा स्लो रेस, टो युअर बडी आणी ईतर स्पर्धेत मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
या स्पर्धांमध्ये उतरण्यासाठी ग्रुप च्या रायडर्स नी भरपूर प्रॅक्टिस केली होती. अलंकार गॅरेज चे अमोल माळी, निपाणी येथील पांडुरंग चव्हाण यांनी तांत्रिक बाजू सांभाळली. क्लब चे अध्यक्ष जयदीप पवार यांचे विशेष प्रोत्साहन आणि मार्गदर्शन रायडर ना लाभले. या व्यतिरिक्त इवेंट मध्ये मोहन वाईंगडे, रोहीत पवार, संतोष धनवडे, अभिजीत काशिद, मेहुल ठक्कर, संजय ओसवाल, विपुल ओसवाल, रोहन पाटील, प्रकाश तेजम, पिनाक गोखले, स्वप्नील पाटील क्लबच्या रायडर्सनी सहभाग नोंदविला.
पुढील वर्षी WCRM चे आयोजन नाशिक येथे करण्यात आले आहे. पुढील महिन्यात गोवा येथे होणाऱ्या राइडर मेनिया या स्पर्धेसाठी कल्बचे रायडर्स जोरदार प्रॅक्टिस करत आहेत.



Comments
Post a Comment