‘हिंदु राष्ट्रा’चा आवाज बुलंद करण्यासाठी निपाणी येथे 27 नोव्हेंबरला हिंदु राष्ट्र-जागृती सभा ! - किरण दुसे, हिंदु जनजागृती समिती
निपाणी 25 सिटी न्यूज नेटवर्क
भारताच्या संविधानात प्रस्तावनेत प्रत्येक नागरिकाला समता, बंधुता आणि न्याय मिळेल, असे म्हटले जाते. प्रत्यक्षात आपल्या देशात अल्पसंख्य आयोग, सच्चर आयोग, अल्पसंख्यांक विकास मंत्रालय आहे; मात्र बहुसंख्य हिंदूंना कोणतेही संरक्षण देणारे मंत्रालय-आयोग नाही. देशभरात केवळ हिंदूंच्याच मंदिरांचे सरकारीकरण, तर मशिदी-चर्चचे सरकारीकरण का नाही ? अल्पसंख्याकांना धर्माच्या आधारावर शैक्षणिक अनुदान, मग बहुसंख्य हिंदूंनी काय अपराध केला आहे ? हे सर्व पहाता भारतात खरोखरच ‘सेक्युलर’ व्यवस्था अस्तित्वात आहे का ? हिंदूंच्या हजारो युवतींना उद्ध्वस्त करणारा नवा आतंकवाद म्हणजे ‘लव्ह जिहाद’. भारतीय अर्थव्यवस्थेवरील नवे संकट ‘हलाल जिहाद’ यांसारख्या हिंदूंवर होणार्या अनेक अन्यायांना वाचा फोडण्यासाठी, तसेच हिंदु राष्ट्राचा आवाज बुलंद करण्यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने निपाणी येथे 27 नोव्हेंबर या दिवशी म्युनिसिपल हायस्कूल मैदान, जुना बी.पी. रोड येथे सायंकाळी 5.30 वाजता हिंदु राष्ट्र-जागृती सभा आयोजित करण्यात आली आहे, अशी माहिती हिंदु जनजागृती समितीचे कोल्हापूर जिल्हा समन्वयक श्री. किरण दुसे यांनी पत्रकार परिषदेत दिली. या प्रसंगी निपाणी नगरपालिकेचे नगराध्यक्ष श्री. जयवंत भाटले, नगसेवक श्री. संतोष सांगावकर, माजी नगरसेवक श्री. विजय टवळे, हिंदुत्वनिष्ठ श्री. अभिनंदन भोसले, सनातन संस्थेचे डॉ. मानसिंग शिंदे, इस्कॉनचे श्री. अनिल खांडके, अद्वैत पंथभक्त मंडळाचे अध्यक्ष श्री. अण्णासाहेब कुलकर्णी, यर्नाळ येथील कीर्तनकार ह.भ.प. नवनाथ घाटगे उपस्थित होते.
या प्रसंगी नगराध्यक्ष श्री. जयंवत भाटले म्हणाले, ‘‘हिंदु जनजागृती समिती गेली २० वर्षे हिंदु राष्ट्र जागृतीचे कार्य करत आहे. भारत हे हिंदु राष्ट्र राहिले पाहिजे. धर्मजागृतीच्या या कार्याची अत्यंत आवश्यकता असून या सभेसाठी सर्वांनी उपस्थित रहावे असे आवाहन मी करतो.’’ या प्रसंगी डॉ. मानसिंग शिंदे, इस्कॉनचे श्री. अनिल खांडके, तसेच ह.भ.प. नवनाथ घाटगे यांनीही हिंदूंनी मोठ्या संख्येने उपस्थित रहाण्याचे आवाहन केले.
श्री. किरण दुसे पुढे म्हणाले, ‘‘या सभेत सनातन संस्थेच्या सद्गुरु स्वाती खाडये, हिंदु जनजागृती समितीचे पश्चिम महाराष्ट्र, कोकण, गोवा आणि गुजरात राज्य समन्वयक श्री. मनोज खाडये, हिंदु विधीज्ञ परिषदेचे महाराष्ट्र अधिवक्ता संघटक नीलेश सांगोलकर हे वक्ते सभेत मार्गदर्शन करणार आहेत. या सभेच्या ठिकाणी क्रांतीकारकांबद्दल माहिती देणारे फलक, हिंदूंना प्रतीदिन करावयाच्या धर्माचरणाच्या कृती, साधना यांविषयी मार्गदर्शन करणारे फलक प्रदर्शन, तसेच हिंदु जागृती करणार्या ग्रंथांचे अन् हिंदूंना धर्मशिक्षण देणार्या विविध ग्रंथांचे प्रदर्शनही लावण्यात येणार आहे.
सभेसाठी निपाणी परिसरातील अनेक गावांमध्ये प्रसार चालू असून गेले महिनाभर विविध तरुण मंडळे, महिलांचे गट, ग्रामस्थ, हिंदुत्वनिष्ठ, लोकप्रतिनिधी यांच्या बैठका घेण्यात येत आहेत. कोपरा बैठका यांसमवेत भित्तीपत्रके, हस्तपत्रके, फलकलेखन, होर्डिंग, सामाजिक संकेतस्थळ यांच्या माध्यमातून व्यापक स्तरावर सभेचा प्रसार चालू आहे. अनेक युवक धर्मरक्षणाच्या कार्यात सहभागी होण्याची इच्छा प्रदर्शित करत आहेत. तरी 27 नोव्हेंबरला होणार्या सभेसाठी या सभेसाठी हिंदूंनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन श्री. किरण दुसे यांनी केले आहे.

Comments
Post a Comment